Snehalata Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Snehalata Kolhe : अयोध्या सोहळ्यानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवरील फोटोंवरून स्नेहलता कोल्हेंची कार्यकर्त्यांना तंबी, म्हणाल्या...

MLA Ashutosh Kale : अयोध्येला जाणाऱ्या संत-महंतांची आमदार आशुतोष काळे मिरवणूक काढणार आहेत, मात्र...

सरकारनामा ब्यूरो

मोबीन खान

Ahmadnagar Politics : अयोध्येत श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पाडणार आहे. यासाठी देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी या सोहळ्यासाठी तयारी केली जात आहे. विविध ठिकाणी अनेक नेते मोठे फ्लेक्स (बोर्ड) लावून या सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत.

परंतु अनेक फ्लेक्सवर प्रभू श्रीराम आणि संत-महंतांच्या फोटोपेक्षा नेत्यांचे फोटो मोठे असल्याचे दिसत आहे. यावरून कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे फ्लेक्स छापताना माझा फोटो फ्लेक्सवर छापू नये आणि संत-महंतांचे फोटो टाकावेत, अशा सूचना भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. माजी आमदार कोल्हे यांची ही तंबी दिलेली पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पोस्टमध्ये माजी आमदार कोल्हे यांनी म्हटले आहे, 'जय श्री राम... नम्र विनंती... नमस्कार... 22 जानेवारीला अयोध्यात प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. यानिमित्त कुठेही फ्लेक्स लावताना माझा फोटो त्यावर वापरू नये, ही नम्र विनंती. कारण, आपण सर्वजण प्रभू रामभक्त म्हणून हा सोहळा साजरा करतो आहोत. त्यात राजकीय पक्ष चिन्ह या व्यतिरिक्त असणारा हा आनंदोत्सव आपण रामभक्त म्हणून साजरा करीत आहोत.'

तसेच, 'हे करीत असताना आपले फोटो वापरण्याऐवजी साधू, संत, महंत आणि कारसेवकांचे फोटोचा वापर करून हा उत्सव धार्मिक पद्धतीने साजरा करूयात. केवळ प्रभू श्रीराम यांचाच फोटो सर्वत्र सर्व फलकावर असणे उचित ठरेल. आपल्या अस्मितेचा भावभक्तीचा हा राम मंदिर सोहळा मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने, गुण्यागोविंदाने साजरा करूया, हे नम्र आवाहन... जय श्रीराम.'

कोपरगाव शहरात अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात अनेक कार्यक्रमावेळी फ्लेक्स वॉर पाहायला मिळतो. आमदार काळे अयोध्येला जाणाऱ्या संत-महंतांची मिरवणूक काढून पूजन करणार आहेत. त्या कार्यक्रमाचे अनेक फलक शहरात लागले असून त्यावर आमदार काळे यांचे फोटो मोठे आहेत. आमदार काळेंनी लावलेल्या फ्लेक्सवर संतांचे फोटो नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आमदार काळे यांच्या फ्लेक्सवर टीका केली आहे.

सोशल मीडियामध्ये ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात म्हटले आहे, की "तुम्ही कर्तृत्ववान असालही... पण धार्मिक क्षेत्रात ज्यांच्या योगदानापुढे त्यांचे भक्त नतमस्तक होतात. त्यांची तुम्ही शोभायात्रा काढणार आहात. त्या कोपरगाव तालुक्यातील संत-महंतांचे फोटो कुठे व कुठल्या मार्गावर लावून त्यांचा गौरव केला काय?' असा प्रश्न पोस्टमधून उपस्थित केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT