Meeting Session : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडूनही आता रणनीती ठरणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील सर्व विभागांत विभागनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
18 जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. स्वबळावर लढण्याचे काम पडल्यास ‘है तयार हम’ म्हणत व्यूहरचना केली जात आहे. लोकसभेसाठी येत्या मार्च-एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागू होईल, अशी शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची यादी प्रसिद्ध केली आहे. देशासह राज्यातील 48 जागांचा समावेश आहे.
समन्वयक आपापल्या लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे आकलन करतील आणि इंडिया आघाडीतील जागावाटप चर्चेसाठी पक्षनेतृत्वाला अभिप्राय देतील. दुसरीकडे आता काँग्रेसकडून प्रत्येक विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघानुसार काय करायचे ते ठरणार आहे.
नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे सत्र होत असून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष तथा काँग्रेस कार्य समितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील, राज्यातील माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन सत्रांत बैठक होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विभागीय बैठक सकाळ 10 ते दुपारी 1 वाजण्याच्यादरम्यान आणि दुपारच्या सत्रातदेखील होणार आहेत. अमरावती विभागाची बैठक 18 जानेवारीला होईल. नागपूर विभागाची बैठक 20 जानेवारीला, पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यात 23 जानेवारीला, कोकण विभागाची बैठक भिवंडीत 24 जानेवारीला, उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळ्यात 27 जानेवारीला आणि मराठवाडा विभागाची बैठक लातुरात 29 जानेवारीला होणार आहे.
बैठकीच्या सत्रानंतर काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. महाविकास आघाडीची पहिल्या टप्प्याची बैठक पार पडली आहे. त्यात जवळपास 90 टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. उर्वरित काही जागांवरील तिढा हा दुसऱ्या बैठकीत सुटण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळाच्या पूर्ण तयारीत आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.