Rajabhau waje sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha: राजाभाऊ वाजे म्हणाले; ...तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही!

Sampat Devgire

Nashik Lok Sabha Election 2024: शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्यांच्या विरोधकांकडून ते ग्रामीण भागातील आहेत. इंग्रजी येत नाही, अशी टीका करण्यात आली होती. नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि भास्करराव भगरे (Rajabhau Waje and Bhaskarrao Bhagre) हे दोन्ही उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यकर्त्यांकडून शक्ती प्रदर्शन देखील होईल. यानिमित्ताने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

माजी आमदार वाजे यांनी गेल्या तीन आठवड्यात लोकसभा मतदारसंघाच्या (Lok Sabha constituency) सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. विविध भागात मेळावे देखील झाले. त्यांनी आपल्या प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्यामुळे विरोधक प्रचार आणि संपर्क या त्यांच्यापेक्षा खूपच मागे आहेत. महायुतीकडून अद्याप नाशिक मतदार संघासाठी उमेदवार जाहीर होऊ शकले नाही. या विरोधकांनी वाजे हे ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. त्यांचे फारसे शिक्षण झालेले नाही असा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधकांच्या या आरोपांना सडेतोड उत्तर देत माजी आमदार वाजे यांनी विरोधकांना थेट आव्हानच दिले आहे. या संदर्भात ते म्हणाले, माझे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झालेले आहे. प्राथमिक, माध्यमिक यांसह मी इंग्रजीत शिकलो आहे. साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये माझे शिक्षण झाले आहे. नाशिकच्या महाविद्यालयातून मी पदवी घेतलेली आहे. मी ग्रामीण भागात राहतो त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अपील होईल असा माझा साधा पेहराव असतो. तो टिकेचा विषय होऊ शकत नाही. मात्र टीका करण्यासाठी काहीच नसल्याने विरोधक असे करत असावे.

एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने केलेल्या या प्रश्नावर वाजे यांनी त्या पत्रकारालाही तुम्ही माझी इंग्रजीत मुलाखत घ्या, असे आव्हान दिले. वाजे म्हणाले, माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने केव्हाही समोरासमोर येऊन इंग्रजीतून चर्चा करावी. मी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देईन. अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली, तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. शिवसेनेच्या वाजे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना थेट आव्हानच दिले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT