Solapur, 28 April : शरद पवार यांनी मोहिते पाटील यांचे राजकारण जवळजवळ संपुष्टात आणलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आता त्यांना काय करायचं आहे, याचा निर्णय मोहिते पाटील यांना घ्यायचा आहे. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मोहिते पाटील यांच्या घरातही सर्वांना पटला आहे, अशी परिस्थिती नाही. पण ठीक आहे, मी त्यावर काही बोलणार नाही आणि मला बोलायचंही नाही, अशा शब्दांत मोहिते पाटील कुटुंबीयांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाबाबत भाष्य केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Lok Sabha Constituency) भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ माढा तालुक्यातील वाकाव येथे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना फडणवीस यांनी मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या अनुंषगाने टिपण्णी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोहिते पाटील यांनी तुमच्याकडून फायदे घेतले, तेच मोहिते पाटील आज तुमच्यावर टीका करत आहे, या प्रश्नावर फडणवीस यांनी, ‘मोहिते पाटील यांच्या प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देऊ,’ असे सूचक विधानही केले.
माढा तालुक्यातील बबनराव शिंदे- तानाजी सावंत ज्या पद्धतीने एकत्रित आले, त्या प्रमाणे फलटणमधील रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर एकत्र येणार का, यावही फडणवीस यांनी ‘मोदी है तो मुमकीन है,’ असे सांगत आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचाच असतो. विभाजन करणारे आम्ही नाही आहोत. आता काय काय होतंय, हे पुढे पाहत राहा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, धवलसिंह मोहिते पाटील अथवा अभिजित पाटील यांच्यापैकी कोणाचाही आज भाजपमध्ये प्रवेश नाही. ज्या पद्धतीने आम्ही माढा, सांगोल्यात सभा घेत आहेत, त्याच पद्धतीने अकलूजमध्ये आमची सभा होणार आहे. त्यामुळे वेगळा विचार करण्याचे काही कारण नाही. त्या ठिकाणी आम्ही सभा घेत आहेत, म्हणजे आश्चर्य आहे, असे काही नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभा कोठे कोठे होणार आहेत, हे लवकरच घोषित करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.