Congress News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics : ...म्हणून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षाविरोधात नगरच्या गुजराती समाजाने घेतली पोलिसांत धाव

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नगर शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचा यांच्या विरोधात समाज माध्यमातून गुजराती समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी नगर शहरातील समस्त गुजराती समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुजराती समाजाने मनोज गुंदेच्या यांच्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलीस ठाण्यात आज दुपारी याप्रकरणी गुजराती समाज मोठ्या संख्येने एकत्रित आलेला होता.(Crime News)

नुकतीच 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्व करंडकाच्या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला विश्वविजेते पदाची ट्रॉफी प्रदान केली. यावेळेस झालेला घटनेचा फोटो फेसबुक समाज माध्यमात पोस्ट करत मनोज गुंदेच्या यांनी केलेल्या कमेंटवर गुजराती समाजाने आक्षेप घेतला आहे. या विरोधात गुंदेचा यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मंगळवारी दुपारी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुजराती समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले होते. यावेळी समाजाच्या नागरिकांनी गुंदेचा यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र अशी भावना दिसून येत होती. यावेळी गुजराती समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनाही गुजराती समाजाने या बाबतचे निवेदन दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत गुजराती(Gujrati) समाजाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितल्या की, मनोज गुंदेच्या यांनी समाज माध्यमात केलेल्या पोस्टमुळे समाजा-समाजा मध्ये तेढ निर्माण होणार आहे. त्याच बरोबर त्यांनी पोस्ट केलेल्या फोटो आणि त्यासोबत केलेल्या कमेंट मुळे गुजराती समाजाच्या धार्मिक भावना या दुखावलेल्या आहेत.

गुंदेच्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचाही अपमान केलेला आहे. एकूणच यामुळे समाजामधील वातावरण गढूळ होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी तातडीने मनोज गुंदेच्या यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करून कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मनोज गुंदेचा हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार आल्याने पक्षा पूढे समस्या निर्माण झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT