Mumbai News : दिल्ली विधानसभेची निवडणुक सत्ताधारी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये झाली. या 'कांटे की टक्कर'च्या लढाईत भाजपने 27 वर्षांनंतर दिल्ली तख्त काबीज केले. या विजयाचे सेलीब्रेशन भाजपने दिल्ली मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित केले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण केली. मोदी यांच्यापाठोपाठ भाजपचे अहिल्यानगरमधील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील अण्णा हजारे यांची आठवण काढताना, अरविंद केजरीवाल यांनी अण्णांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा त्यांना हे दिवस आले, असा टोला लगावला.
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय हा विचारांचा आहे. पण अरविंद केजरीवाल यांनी राजकारण करताना भ्रष्टाचारात वाहून गेले. पद्मविभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) आयुष्य भ्रष्टाचाराविरोधाच्या लढाईत घालवले. पण अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विचारांशी प्रतारणा केली. दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांची जागा दाखवली, असा टोला लगावला.
मंत्री विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' या मंत्राला दिल्लीच्या जनतेने समर्थन दिले आहे. या निवडणुकीतील विजयाचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि जे.पी. नड्डा यांच्या यशस्वी रणनीतीला जनतेने साथ दिल्याचे म्हटले.
भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला ऐतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा असून पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्याशी प्रतारणा करणाऱ्यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचारी आदमी पक्षाच्या राजवटीला जनता कंटाळली होती. लोकांच्या नावाखाली योजना तयार करुन त्यातील स्वार्थीपणा हा जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे म्हणाले, "ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाचा उपयोग करुन अरविंद केजरीवाल यांनी व्यक्तिगत राजकारणाला महत्त्व दिले. त्यामुळे विचारांशी केलेल्या प्रतारणेला जनतेने पराभव करत योग्य उत्तर दिलं".
मागील काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने मतदान यादीतील आकडेवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची खिल्ली उडवून मंत्री विखे यांनी आता तरी राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करावे. दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला सपशेल नाकारले आहे. परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांना जनता थारा देत नाही, हे दिल्लीच्या निकालाने काँग्रेसला दाखवून दिले आहे, असा टोला लगावला.
'आम आदमी पक्ष हा आम्ही राजकारण बदलून टाकणार म्हणत राजकारणात आले होते. पण ते तर कट्टर बेईमान निघाले. यावेळी श्रीमान अण्णा हजारे यांच्या विधानासाठी आठवण येते. अण्णा हजारे गेले कित्येक वर्षांपासून या 'आप'वाल्यांची दुष्कृत्यांची पीडा झेलत होते. त्यांनाही आज या 'आप'दावाल्यांच्या दुष्कृत्यांपासून मुक्ती मिळाली असेल', असा चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.