BJP leader Pravin Darekar
BJP leader Pravin Darekar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्य सरकार कोरोना काळात दवा नाही तर दारु देत आहे!

Sampat Devgire

साक्री : राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यात लक्ष देण्यास राज्य सरकारला (Mahavikas Aghadi) वेळ नाही. कोरोना (Covid19) काळात सामान्यांना दवा देता आली नाही. आता हे सरकार जनतेला दारु देत आहे. त्याला जनता विरोध करील, असे प्रतिपादन भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले.

श्री. दरेकर शनिवारी साक्री दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील सरकारवर टिका केली. ते म्हणाले, बारा आमदारांच्या निलंबनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक दिली आहे. काही बाबींवरून कायद्याला जुमानायचे नाही असेच महाआघाडी सरकारने ठरविलेले दिसते.

ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात जे दवा (औषध) देऊ शकले नाहीत, ते आता दारू देत आहेत, त्यामुळे आघाडी सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा आहे. यात सरकार शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कुणाचे भले करत आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. गारपीट, अतिवृष्टीत शेतकऱ्यांना दमडी दिली नाही. कर्जमाफी झालेली नाही. असे पाप लपविण्यासाठी वाईनचे कारण पुढे केले जात असून राज्यात महिला, मुले या निर्णयाला विरोध करतील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT