विरोधकांना ओरडू दे, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे!

आम्ही राजकारणाला नाही तर राज्याच्या हिताला प्राधान्य देतो.
Envirnment Minister Aditya Thakre
Envirnment Minister Aditya ThakreSarkarnama

नाशिक : सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला राज्य शासनाने (Mahavikas Aghadi Front) परवानगी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून (BJP) मोठ्या प्रमाणात टीका होत असताना या विषयावर आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महसूल वाढविणे, तसेच राज्याच्या हिताचा निर्णय घेत आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

Envirnment Minister Aditya Thakre
प्रविण दरेकरजी, टिका करण्या आधी थोडे शुद्धीत या!

ते म्हणाले, कोरोना संदर्भात राज्य शासन जे काही निर्णय घेते जागतिक आरोग्य संघटना व तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने केलेल्या सूचनांनुसार अमलात आणल्या जातात त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात मास्क मुक्ती होणार नाही. नाशिकमध्ये विविध विकासकामांच्या उद्‌घाटनानिमित्ताने श्री. ठाकरे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र मास्कमुक्त होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

Envirnment Minister Aditya Thakre
निधी वाटपात भाजप व राष्ट्रवादीसह विरोधकांना समान वाटा

ते म्हणाले, पायाभूत सुविधा पुरविताना किंवा विकासाची कामे करताना शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये याच अनुषंगाने कामे केली जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कन्वेक्शन सेंटरला चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळांच्या पाचशे मीटर आवारामध्ये मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. अर्बन प्रोटेक्शननुसार झाडे वाचू याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट क्लायमेट कौन्सिलची स्थापना करण्यात आल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

राज्याच्या हिताचा निर्णय

ते म्हणाले, आम्ही जनता व राज्याच्या हिताचाच विचार करतो. राजकारणाचा विचार करीत नाही, त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय टीका केली याला उत्तर देणार नाही, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. राज्य सरकार महसूल वाढविण्यासाठी निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येला दोनदा जाण्याची संधी मिळाली. आता निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com