Medha Patkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Medha Patkar : मी गुजरातची भावी मुख्यमंत्री नाही, तो केवळ अपप्रचार!

नवनिर्माण न्यासा तसेच नर्मदा आंदोलनाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची तक्रार मेधा पाटकर यांनी केली आहे.

Sampat Devgire

शहादा : नर्मदा खोरे (Narmada basin) विस्थापितांच्या (displaced) नवनिर्माण न्यास संस्थेबाबत (Navnirman Trust) खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या (Narmada Bachav Andolan) नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. त्या म्हणाल्या, मी आप पक्षाची मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. (Medha Patkar complains about state & Centre for harassment her)

त्या म्हणाल्या, ‘हेराफेरीचाही आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा ‘ईडी’मार्फत चौकशी केली. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. नर्मदा आंदोलनाबाबत निराधार प्रश्न उपस्थित केले जात असून, गुजरातच्या निवडणुकीत मुद्दा बनविण्याच्या खटाटोप असल्याचेही श्रीमती पाटकर यांनी सांगितले.

केंद्रामार्फत लावण्यात येत असलेल्या आरोपासंदर्भात पाटकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते कांती पावरा, निमा पटले, पुण्या वसावे, अनिल कुवर, ओरसिंग पटले आदी उपस्थित होते. नर्मदा खोऱ्यातील विस्थापितांना न्याय देण्यासाठी २००४ मध्ये विश्वस्त संस्था नवनिर्माण न्यास संस्थेची स्थापना केली, ज्यात शेतकरी, नर्मदा खोऱ्यातील आदिवासी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट कलावंत यांचा समावेश केलेला आहे. अत्यंत पारदर्शक व्यवहार असलेल्या संस्थेवर खोटे आरोप लावून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे, असा आरोप करीत श्रीमती पाटकर म्हणाल्या, ‘‘आम्ही हेराफेरी करणारे आहोत, असा आरोप लावून आमचे आंदोलन थांबणार नाही, ते सुरूच राहील. आम्ही उलट तपास यंत्रणांना सहकार्य करीत असतो. पाच हजारांपेक्षा जास्त कागदपत्रे दिली आहेत. आंदोलनाबाबत आमचा मुद्दा खरा आहे. त्याला शासकीय तपास यंत्रणाचा उपयोग करून दाबण्याच्या प्रयत्न केला जात आहे.’’

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचा आपल्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. आम आदमी पक्षाचा वाढता प्रभाव बघता माझ्या नावाचा वापर करून बदनामी करीत असल्याचा आरोपही मेधा पाटकर यांनी केला. नर्मदेचे पाणी गुजरातला लोकांपर्यंत न जाता उद्योजकांपर्यंत पोचविले आहे. आमचे जीवन नर्मदा खोऱ्यातील आदिवासींना न्याय देण्यासाठी आहे, ते शेवटपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून सुरूच राहील, ते दाबले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT