Raju Shetty Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांना बँकेच्या पाशवी कर्जातून मुक्त करा!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे लक्ष घालण्याची मागणी केली.

Sampat Devgire

दिंडोरी : नाशिक (Nashik) जिल्हा बँकेत साधारण ६२ हजार शेतकऱ्यांचे (Farmers) एक हजार ४०० कोटी रुपये थकीत आहे. या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार बँकेने (District Bank) बंद केले आहे. या शेतकऱ्यांना बँकेच्या पाशवी कर्जातून मुक्त करायचे असेल तर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवण्याचा आदेश तत्काळ मुख्यमंत्र्यांनी (CM) नाशिक जिल्हा बँकेला द्यावेत किंवा या बँकेला स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. (Raju Shetty deemands for OTS scheme for district Bank)

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात बैठक झाली. अनेक शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई बँक करीत आहे. यासंदर्भात शेतकरी वर्गात नाराजी आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारचे चुकीचे धोरण, नोटबंदी, बँकेचे चुकीचे व्याज दर यामुळे कर्ज थकीत झाले आहे. ही बाब राजू शेट्टींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. श्री. शेट्टी यांच्या मागणीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे यांनी देखील दुजोरा दिला. बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

नियमबाह्य व्याज आकारणी

शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बँकेची ही दुरवस्था होण्यामध्ये नोटबंदी, प्रशासनाचा अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार कारणीभूत आहे. परंतु, या सगळ्यांचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय. मागील काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, भाजीपाला या पिकांची दुर्दशा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला नाही. शेतकऱ्यांकडून कर्ज थकीत झाले.

बँकेने नियमबाह्य व्याज लावले. यामुळे मुद्दलपेक्षा अनेक पटीने व्याज वाढले आहे. जे शेतकऱ्यांच्या भरण्याच्या क्षमतेबाहेर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT