Dr Bharati Pawar News : केंद्र शासनाने गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली कांदा निर्यात बंदी आज मागे घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने तो चर्चेचा विषय आहे. त्याचे शेतकऱ्यांमध्ये कसे स्वागत होते हा उत्सुकतेचा विषय आहे.
कांदा निर्यात बंदीचा राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. विशेषतः शेतकऱ्यांमध्ये या विषयावर केंद्रशासनाबाबत प्रचंड रोष होता. दिंडोरी, धुळे आणि नाशिक मतदार संघात लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मतदारांकडून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यात येत होते. उमेदवारांनाही प्रचारात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आज हा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्याचे स्वागत करीत विरोधकांना लक्ष्य करण्यात आले आहे. Loksabha Election 2024
या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार आणि राज्यमंत्री डॉक्टर पवार (Bharati Pawar) यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. विरोधकांचा कुठलाही अभ्यास नाही. कुठलीतरी माहिती घेऊन येऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम ते करीत आहेत. आज केंद्र शासनाने (Central Government) शेतकरी हिताचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही गेले काही दिवस पाठपुरावा करीत होतो. त्याचे फलित म्हणून हा निर्णय झाला आहे. त्यामुळे विरोधकांना आज नक्कीच दुःख झाले असेल. कारण त्यांना फक्त राजकारणात रस आहे अशी टीका त्यांनी केली.
त्या म्हणाल्या, सध्या आवक वाढल्याने केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये 550 डॉलर प्रति टन ही सीमा निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही देशाला कांदा निर्यात करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच गेली पाच वर्षे आम्ही काम करत होतो. शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. ती आता प्रत्यक्षात येईल.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच आज कांदा निर्यात खुली करण्यात आली. त्याचा निवडणुकीच्या प्रचारावर निश्चितच परिणाम होणार आहे. निवडणुका आचारसंहिता सुरू असताना कांदा निर्यातीबाबत गेल्या आठवड्याभरात दोन वेळा निर्णय झाले. याविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आचारसंहिता असताना यापूर्वी 99 हजार टन कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आल्याची बातमी आली होती. ती बातमी म्हणजे यापूर्वीच्या निर्णयांचा गोषवारा होता असे स्पष्ट झाले. त्यामुळे आज झालेल्या निर्णयाचा तरी खरोखर कांदा निर्यातीला लाभ होईल का? अशी चर्चाही शेतकऱ्यांमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.