Nashik Lok Sabha Election 2024 : वाजेंच्या बालेकिल्ल्यात हेमंत गोडसेंचा एकाकी प्रचार, कोकाटे फिरकलेच नाही; कारण...

Hemant Hodse News : महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे सध्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात प्रचार करीत आहेत
hemant godse manikrao kokate
hemant godse manikrao kokatesarkarnama

Nashik News, 4 May : नाशिक लोकसभा मतदारसंघात ( Nashik Lok Sabha Constituency ) महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सिन्नर मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ) यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या प्रचाराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार गोडसे ( Hemant Godse ) यांनी शुक्रवार ( 3 मे ) सिन्नर मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या या प्रचारात प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले. खासदार गोडसे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामे आणि भावी योजनांची माहिती देत गावोगावी बैठका सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांचा हा प्रचार वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरला आहे.

खासदार गोडसे महायुतीचे उमेदवार आहेत सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate ) आमदार आहेत. त्यामुळे गोडसे यांच्या प्रचारात आमदार कोकाटे सहभागी होणे अपेक्षित होते. परंतु, असे दिसले नाही. कोकाटे यांचे समर्थक देखील अभावानेच त्यांच्या प्रचारात आहेत. त्यामुळे महायुतीचे असले तरीही खासदार गोडसे सध्या स्वतः प्रचाराचा किल्ला लढवत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार कोकाटे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. बारामती मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. या मतदारसंघातील निवडणूक येत्या सात मे होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि पदाधिकारी बारामती मतदारसंघात तळ ठोकून आहेत. या स्थितीत महायुतीचे गोडसे सिन्नरला आणि स्थानिक आमदार कोकाटे मात्र बारामतीला अशी विसंगती निर्माण झाली आहे.

दरम्यान, याबाबत आमदार कोकाटे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दृष्टीने बारामती मतदारसंघातील निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही या प्रचारात व्यस्त आहोत. खासदार गोडसे सिन्नरमध्ये प्रचाराला कसे आले, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. स्थानिक आमदार नसताना महायुतीच्या उमेदवाराला नागरिकांकडून कितपत प्रतिसाद मिळेल. हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गोडसे यांनी थेट प्रचार करण्याआधी आमचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्यावेत. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट आश्वासन हवे आहे. त्यासाठीची चर्चा झाल्याशिवाय तूर्त आम्हाला प्रचारात सहभागी होता येणार नाही."

hemant godse manikrao kokate
Nashik Loksabha Election : 'शांतिगिरीं'नी नाशिकची 'शांती' केली भंग? इच्छुकांची धडधड वाढली

सिन्नर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वाजे यांचा मतदारसंघ आहे. येथे विविध कार्यकर्ते आपसातील मतभेद विसरून वाजे यांच्या प्रचारात व्यस्त आहेत, अशा स्थितीत श्री गोडसे यांनी आज ठाणगाव परिसरातील गावांमध्ये जाऊन बैठका घेत प्रचार केला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

hemant godse manikrao kokate
Nashik Constituency 2024: आमदारांची मनधरणी करण्यात शिवसेना शिंदे गटाची होते दमछाक !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com