Ramraje Nimbalkar
Ramraje Nimbalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`त्या` टाईपिंग मिस्टेकविषयी आमदारांना गृहराज्यमंत्र्यांशी चर्चेची सूचना

Sampat Devgire

नाशिक : पुणे (Pune) येथील महिला कर्मचाऱ्याच्या बदली आदेशात आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्यात आला. या विषयावर आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळेत वातावरण चांगलेच तापले. आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याएैवजी टंकलेखकावर कारवाई झाली. सदस्यांनी `एसपी` वर कारवाईचा आग्रह धरल्याने याबाबत सदस्यांनी गृहराज्यमंत्र्यांशी (Home Minister) चर्चा करावी, अशी सुचना सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी दिल्या.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य गोपिचंद पडळकर यांनी पुणे पोलिस अधिक्षकांच्या कार्यालातून एक महिलेच्या बदलीच्या आदेशात आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्यात आला. असा शब्दप्रयोग अतिशय आक्षेपार्ह तसेच महिलांचा अवमान करणारा आहे. एकीकडे आपण महिला सन्मानासाठी कायदे करतो व दुसरीकडे असे शब्दप्रयोग होतात, त्यावर कुठलीच कारवाई होत नाही. त्याने महिलेचा अमान झाला आहे. त्याबाबत गुन्हा दाखल का झाला नाही, असा प्रश्न केला.

यावर गृहराज्यमंत्र्यांनी त्याबाबतचे उत्तर पटलावर ठेवले. यासंदर्भात माहिती घेण्यात आली. याबाबत अनेक आदेश सहील येत असतात. त्यातून त्यावर सही झाली. ते लक्षात आल्यावर त्यात दुरुस्ती करण्यात आली. संबंधीत टंकलेखकांवर कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत संबंधीतांना समज देण्यात आली. संबंधीत महिला कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, असे सांगितले.

त्यावर श्री. पडळकर यांनी एकदा गंभीर प्रकार जाला. त्यावर सारवासारव कशी करता येईल. याबाबत दखलपात्र गुन्हा का दाखल झाला नाही. हा उघड उघड कलम ५०० अन्वये गुन्हा होत आहे. त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यावर कारवाई करावी, असा आग्रह धरला. त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने सदस्य आक्रमक झाले.

याबाबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप केला. संबंधित अधिकाऱ्यांनी मी पुणे शहरात केलेल्या भाषणातील वक्तव्याचा विपर्यास केला. महिलांविषयी विधान केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मी भाषण केले मग लाऊडस्पीकर वाल्यावर गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न केला. याबाबत संबंधीत एसपींवर कारवाई झाली पाहिजे. ती झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही. आमदार सदाशिव खोत यांनीही त्याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यात वातावरण तापले.

यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी गृहराज्यमंत्र्यांनी श्री. पडळकर, श्री. दरेकर व श्री. खोत यांच्याशी येत्या एक दोन दिवसांत आपल्या दालनात चर्चा करावी. त्यावर योग्य तोडगा काढावा अशी सुचना केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT