Nilesh Apar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Bribery News : पैसे उकळण्यासाठीच प्रातांधिकाऱ्यांनी कंपनीला दिली होती नोटीस

Sub Divisional Officer Nilesh Apar Arrest for Bribe : कंपनीला एनए करण्याची काहीच गरज नव्हती

सरकारनामा ब्यूरो

Nashik ACB News : नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्यावर बुधवारी (ता. २९) 'एसीबी'ने कारवाई केली आहे. नाशिकच्या दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी तब्बल ४० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर 'एसीबी'ने कारवाई केली आहे. एका खासगी कंपनीची जमीन अकृषक (एनए) करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अपार यांनी ही लाच मागितली होती. या प्रकरणी आता मात्र नवीन माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणातील कंपनीला नोटीसच चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व नॅशनल बोर्ड फॉर 'एमएसएमई'चे सदस्य प्रदीप पेशकार याबाबत माहिती दिली.

पेशकार म्हणाले, "लाचेच्या प्रकरणातील तक्रारदार खासगी कंपनीचे अधिकारी आधी माझ्याकडे आले होते. याबाबत त्यांना मदत व मार्गदर्शन केले होते. त्यांची सर्व कागदपत्र पाहता प्रांत कार्यालयाने दिलेली नोटीस चुकीचे असल्याचे आढळले. या कंपनीला राज्य शासन २०१८ च्या आदेशानुसार अकृषीक परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती. याबाबत सर्व माहिती त्यांना समजावून सांगितली होती."

पेशकार यांनी 'एसीबी'ची कारवाई कशी झाली याचाही उलगडा यावेळी केला आहे. ते म्हणाले, "अधिकाऱ्यांनी कंपनीला नोटीस खोडसाळपणातून दिली होती. तक्रारदाराशी संगनमत करून दिंडोरी प्रांत कार्यालयाने कंपनी बंद ठेवण्याची नोटीस काढली. ती नोटीस परत घेण्यासाठी व कंपनी सुरू करण्यासाठी अधिकाऱ्याने ५० लाखांची मागणी केली होती. यानंतर आम्ही लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, सर्व नियमांनुसार कंपनी सुरू ठेवून वाढीव कामांबाबत योग्य परवानग्या घेण्याचा सल्ला दिला होता."

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून 'एसीबी'ने धडाकेबाज कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखले केले आहेत. त्यानंतर थेट उपविभागीय अधिकाऱ्यांवर 40 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. निलेश अपार यांची 'एसीबी'कडून चौकशी करण्यात येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT