Co-operative Societies Election : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Atul Save News : मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
Co-operative Societies Election news
Co-operative Societies Election newsSarkarnama
Published on
Updated on

Co-operative Politics : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी स्पष्ट केले. याबाबतचा निर्णयही जाहीर केला.

राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा (Elections) कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून जाहिर करण्यात आला होता. राज्यात ३० जूननंतर मोठ्या प्रमाणात पावसाची सुरूवात होत असते. ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे, अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पावसाळ्यात होणार आहे.

Co-operative Societies Election news
Cricket World Cup News : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विदर्भावर अन्याय, अनिल देशमुख लिहिणार बीसीसीआयला पत्र !

त्यामुळे, निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. या सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी खरीप हंगामामध्ये शेतीच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहू शकतात. यामुळे राज्य सरकारने (State Government) या निवडणुका पुढे ढकल्या आहेत.

राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असते. यामुळे नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असते. तसेच, सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी यामुळे जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Co-operative Societies Election news
Nagpur District News : ग्रीन जिममध्ये अनियमितता झाल्याची कॉंग्रेस नेत्यांना शंका; तर खासदार तुमाने म्हणतात, करा तपास !

राज्यात ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. राज्यातील ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहे. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. मात्र अजूनही ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com