Shrirampur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur : जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यादांच असं घडलं; 'लोटांगण' घालताच प्रशासन हादरलं

Movement for a full-length statue of Dr Babasaheb Ambedkar : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूरमध्ये उभारण्यासाठी चळवळीतील नेते सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : श्रीरामपूरमधील चळवळीतील नेते सुभाष त्रिभुवन यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण घातलं आहे. या लोटांगणाची चर्चा सध्या जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय धुरींमध्ये रंगली आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयात, असं पहिल्यांदा कोणीतरी लोटांगण घातलं आहे.

सुभाष त्रिभुवन यांच्या लोटांगणाची प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणींसाठी सुभाष त्रिभुवन यांनी हे लोटांगण घातलं आहे.

सुभाष त्रिभुवन श्रीरामपूरमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणीसाठी सुभाष त्रिभुवन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येत लोटांगण घातले. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सुभाष त्रिभुवन, यांच्याशी चर्चा करत निवेदन स्वीकारले.

श्रीरामपूर येथे पालिका हद्दीत गेली 50 वर्षांपासून डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविलेला आहे. त्याच जागेवर डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे. तसा ठराव श्रीरामपूर पालिकेने केलेला आहे. तसेच पूर्णाकृती पुतळा तयार असून त्याची सर्व रक्कम देखील पालिकेने अदा केलेली आहे. पोलिस (Police) प्रशासन, सार्वजनिक बांधकाम व सर्व शासकीय कार्यालयांनी ना हरकत दाखले दिलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले की, ती जागा वन विभागाची आहे.

पुरावे देऊनही कार्यवाही नाही

यासंदर्भात समितीचे अध्यक्ष त्रिभुवन यांनी पुराभिलेख फोर्ट (मुंबई) येथे संपूर्ण राज्यातील 70 वर्षांचे इंग्रजांच्या काळापासून नोटिफिकेशन आहे. पुतळ्याच्या जागेसंदर्भातील तीन नोटिफिकेशन त्रिभुवन यांनी पाच दिवस थांबून हस्तगत केले. सदरची जागा वन विभागाची असली, तरी पण तिचं निर्वणीकरण झाले असल्याचं पुरावे समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर मोर्चा, रस्ता रोको आंदोलन, निदर्शने, उपोषण असे अनेक प्रकारचे आंदोलने समितीच्या वतीने गेली पाच वर्षांमध्ये केली आहेत.

पंतप्रधानांशी पत्रव्यवहार

तसंच पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या सगळ्यांना निवेदन दिलेले आहे. केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी देखील परवानगीसंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात समितीच्यावतीने लोटांगण घालून लक्ष वेधले. यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यास याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे त्रिभुवन यांनी दिला आहे. यावेळी अमित काळे, संदिप धीवर, संतोष शेळके, निखील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT