Sudhakar-Badgujar-Girish-Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar politics: भाजपवासी बडगुजर ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?... म्हणतात, शिवसेनेचे ८ नगरसेवक आपल्याबरोबर!

Sudhakar Badgujar; Sudhakar Badgujar, who remained deputy leader, says there is no trust in him in the Shiv Sena Thackeray party-शिवसेना ठाकरे पक्षाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देऊनही नेत्यांनी अविश्वास व्यक्त केला.

Sampat Devgire

Sudhakar Badgujar news: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नवा दावा केला आहे. गेल्या आठवड्यात बडगुजर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा प्रवेश भाजप स्थानिक नेत्यांसाठी वादाचा विषय बनला होता.

सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाठिंबा दिला होता. मंत्री महाजन यांच्या पुढाकारामुळेच बडगुजर यांचा स्थानिक नेत्यांचा विरोध असूनही भाजप पक्षात प्रवेश होऊ शकला.

याबाबत आता बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आता मावळला आहे. वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष घातल्याने तो विषय संपला असल्याचे सध्याचे चित्र आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या स्थानिक कामकाजात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर आपल्याविषयी पक्षातील विरोधकांनी जाणीवपूर्वक अविश्वासाचे वातावरण निर्माण केले. नेत्यांनी देखील अविश्वास व्यक्त केला याचे वाईट वाटते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सात ते आठ माजी नगरसेवक आपल्या भूमिकेशी सहमत आहेत. नगरसेवक आपल्या संपर्कात असून लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होईल. महापालिका निवडणुकीत भाजपला शंभरहून अधिक जागा जिंकायचे आहेत. ते ध्येय साध्य करण्यासाठी मी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केला.

आपल्यावर दाखल असलेले गुन्हे किंवा कायदेशीर जाचातून सुटका होण्यासाठी आपण भाजप प्रवेश केला, ही चर्चा त्यांनी नाकारली. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता हे प्रकरण देखील जानेवारीतच संपले होते. त्यामुळे भाजप प्रवेश आपल्यावर दाखल गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी झाला, हा अपप्रचार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT