Mahayuti Politics: महायुतीत मोठा भाऊ भाजप; लहान भाऊ एकनाथ शिंदे की अजित पवार? फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राजकारण फिरणार!

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis : नाशिकसह ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात अनेक इच्छुकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेंच होणार आहे.
Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Mahayuti Politics Local Body Elections 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सत्ताधारी महायुती एकत्र सामोरे जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची जाहीर वाच्यता केली आहे. मात्र महायुती एकत्र लढल्यास स्वबळाचा नारा देणाऱ्या इच्छुकांपुढे पेच निर्माण होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्मुला काय हे मात्र गुलदस्त्यात आहे.

नाशिकसह ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात अनेक इच्छुकांनी प्रवेश केला आहे. सध्या हा वेग मंदावला आहे. भाजपकडेही नव्या नेत्यांचा ओढा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात देखील भाजपमध्ये मोठे इन्कमिंग होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप सत्तेत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार राजकीय अडाखे बांधत आहेत.

नाशिकमध्ये मोठा पेच

महायुती एकत्र निवडणुकांना सामोरे गेल्यास जागावाटप हा महायुतीसाठी महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. विशेषता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी आहे. या इच्छुकांच्या अपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश करतानाच वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे शिंदेंना जागावाटप योग्य वाटा न मिळाल्यास अडचण निर्माण होऊ शकते.

नाशिक शहरात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षातील अनेकांना प्रवेश दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 28 तर मनसे आणि काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर, जवळपास ५० इच्छुकांना उमेदवारी हवी आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Malegaon Elections Result 2025 : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मोठी अपडेट, रंजन तावरेंचे चार उमेदवार आघाडीवर तर अजित पवारांचे ...

भाजपही नाशिकात भक्कम

मावळत्या नाशिक महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत होता. या पक्षाचे 65 नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय आतापर्यंत 13 माजी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. भाजपचा शंभर प्लस असा नारा दिला आहे.

महापालिकेतील सध्याची स्थिती विचारात घेता महायुती एकत्र निवडणुकीला सामोरे गेल्यास सर्वाधिक अडचण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची होणार आहे. महायुतीत केवळ मोठा भाऊ नव्हे तर जवळपास 100 प्रभागांमध्ये भाजपकडे दोन ते तीन प्रबळ इच्छुक आहेत. त्यात एकनाथ शिंदे पक्षाला किती जागा देता येणार? ही समस्या आहे.

महायुतीत लहान भाऊ कोण?

महायुती एकत्र निवडणुकीला सामोरे गेल्यास सध्या जे इनकमिंग सुरू आहे ते महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढू शकते. महाविकास आघाडीचे नेते सध्या महायुतीतील जागावाटपकडे डोळे लावून बसली आहे. त्यामुळे महायुती झाली तरी आणि नाही झाली तरी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मोठ्या भाऊ आणि लहान भाऊ कोण? यावरून वाद अटळ आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Sandeep Joshi - वडेट्टीवारांच्या 'त्या' वक्तव्यावर आमदार जोशींचा पलटवार; म्हणाले 'आधी काँग्रेसचा इतिहास पाहा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com