Sudhir Mungantiwar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : "माझ्या प्रमोशनसाठी सरकार टिकलं पाहिजे, पण..."; प्रणिती शिंदे, अरविंद सावंतांचा उल्लेख करत मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

Sudhir Mungantiwar promotion : राज्यात बहुमताचं सरकार येऊन देखील भाजप नेते आणि माजी मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रि‍पदापासून लांब ठेवलं गेलं. मंत्रीपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

Jagdish Patil

Nashik News, 11 Apr : राज्यात बहुमताचं सरकार येऊन देखील भाजप नेते आणि माजी मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रि‍पदापासून लांब ठेवलं गेलं. मंत्रीपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

अशातच आता त्यांनी राजकीय प्रमोशन संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिकमधील एका व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टीकलं पाहिजे असं वक्तव्य केलं आहे.

या व्याख्यानमालेत येणाऱ्याचं प्रमोशन होतं, असं या कार्यक्रमाचे आयोजक मुनगंटीवारांना म्हणाले होते. कारण मागील व्याख्यानमालेत राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे उपस्थित राहिले होते. त्यामुळे आयोजकांनी फडणवीसांचा दाखला देत प्रमोशनचं वक्तव्य केलं.

आयोजकांच्या वक्तव्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी भर स्टेजवर केलेली मिश्किल टिप्पणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ते म्हणाले, जो जो या कार्यक्रमाला येतो त्याचं प्रमोशन होतं असं आयोजकांनी सांगितलं. माझं दडपण निघालं पण एक शंका राहिली. शंका यासाठी कारण प्रमोशनसाठी माझं सरकार कायम राहिलं पाहिजे.

मात्र, उद्या आणि परवाच्या वक्त्यांची नावे पाहून भीती निर्माण झाली आहे. कारण मला जर प्रमोशन पाहिजे असेल तर माझं सरकार असावं लागेल आणि जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर प्रणिती शिंदे आणि अरविंद सावंत यांना पक्षात घ्यावं लागेल."

नाशिक येथे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्त व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच याचवेळी त्यांनी लोकसभा माझ्या नशिबात नसेल अशी खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, "मी पहिल्यांदा लोकसभा लढलो तेव्हा हरलो आणि आता देखील हरलो. त्यामुळे बहुतेक माझ्या नशिबात लोकसभा नसेल."

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT