Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी अमित शहा भोजन करणार, एकनाथ शिंदेंचा लाडका मंत्री अस्वस्थ?

Amit Shah Sunil Tatkare Bharat Gogawale : अमित शाह शनिवारी सकाळी रायगड किल्ल्याकडे रवाना होतील. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचडगावामध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचे ते दर्शन घेतली.
Ajit Pawar Amit Shah  Eknath shinde
Ajit Pawar Amit Shah Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare Vs Bharat Gogawale : गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (ता.12) ते रायगडच्या दौऱ्यावर असतील. यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भेट देत स्नेहभोजनही करणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना खुद्द अमित शाह हे तटकरेंच्या निवासस्थानी येत असल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हे अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र यावर अजून तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री रायगड किल्ल्यावर येत आहेत तेथून ते सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवास्थानी स्नेहभोजनासाठी येत आहेत. तटकरे हे आपले वजन वापरून आपली कन्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद कायम ठेवले, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे.

शिंदे, गोगावले उपस्थित राहणार?

सुनील तटकरे यांच्या निवास्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित राहणार की नाही या विषयी माहिती मिळू शकली नाही.

असा असेल अमित शाहांचा दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) रात्री गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात मुक्कामी येतील. शनिवारी सकाळी ते रायगड किल्ल्याकडे रवाना होतील. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचडगावामध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचे ते दर्शन घेतली. त्यानंतर रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतली. तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील. तेथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाचया विषयांवर चर्चा करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com