Shivsena leader Sanjay Raut

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

मुनगंटीवारांनी नाव बदलावे, कारण सरकार बरखास्त होत नाही!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकला पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Sampat Devgire

नाशिक : सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना आपले नाव प्रिय नसावे, त्यामुळेच राज्य सरकार बरखास्तीची भाषा करत आहेत. १७० आमदारांचा पाठींबा असलेले राज्य सरकार (Mahavikas Aghadi) बरखास्त करणे पोरखेळ आहे काय? असा प्रश्न करीत, मुनगंटीवार यांनी राष्ट्रपतींचा एखादा स्टॅम्प आणला आहे कीते राष्ट्रपतींच्या घरी धुणी भांड्यांचे काम करतात, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज येथे सांगितले.

खासदार राऊत आज नाशिकला आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतत्यांनी विविध विषयावर भाजप नेते, नारायण राणे व नितेश राणे यांसह विविध विषयावर मतप्रदर्शन करीत भाजपवर टिका केली. ते म्हणाले, मुनगंटीवर यांनी राज्य सरकार बरखास्त करून दाखवीन. न केल्यास नाव बदलेन असे विधान केले होते. यासंदर्भात राऊत म्हणाले, मुनगंटीवार काय बोलतात त्याबाबत खरे तर त्यांनाच विचारायला पाहिजे. कारण त्यांना त्यांचे नाव बदलावेच लागले. त्यांना स्वतःचे नाव प्रिय दिसत नसावे. त्यांचे नाव सुधीर आहे. ते त्यांना आवडत नाही का?.

ते म्हणाले, राज्य सरकारला १७० आमदारांचा पाठींबा आहे. असे सरकार बरखास्त करणे एव्हढे सोपे सते का? असे सरकार बरखास्त करणे सोपे नसते. सुधीर मुनगंटीवार ज्या पद्धतीने बोलतात, त्यानुसरा त्यांच्याकडे राष्ट्रपतींचा एखादा स्टॅम्प आहे की काय़. मुनगंटीवार राष्ट्रपतींच्या घरी धुणी भांड्यांची कामे तर करत नाही ना?.

ते पुढे म्हणाले, राज्याच्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी धमकी दिलेली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रीयेबाबत झालेला तो पत्रव्यावहार आहे. त्याला धमकी म्हणत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देस ओळखतो. त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याकडून असे काही होत नसते. स्वतः राज्यपाल मुख्यमंत्र्यांना ते किती संतपुरुष आहेत, असे म्हणालेले आहेत. राज्यपालांना मी अनेक दिवसांपासून ओळ्खतोय. त्यांची माझी चर्चा झालेली आहे. त्यात केवळ विधानसभेच्या अध्यक्षपदाचा वाद आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या शिफारशीनुसार आमचे १२ आमदार दिले पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे. त्यांना धमकी कोण देतेय ते तुम्ही शोधा?.

खासदार राऊत म्हणाले, राजकीय सुडापोटी राज्यात कसे गुन्हे दाखल होत आहेत ते आमहाला माहिती आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर कसे गुन्हा दाखल झालेले आहेत. त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या सागंण्यावरून केंद्रीय तपास यंत्रणा कशा सक्रीय होतात हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या विषयावर भाजपने उगीच कोल्हेकुई करू नये.

पोलिस हत्येच्या प्रकरणात शोधत आहेत. त्याबाबत केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत सांगतायत की मला माहित नाही. माहिती असले तरी तुम्हाला कशाला सांगू. मला वाटते याबाबत त्यांनी पोलिसांना त्यांनी सहकार्य करावे. मित्र असो पुत्र माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. मात्र एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कोणाला लपवून ठेवले असेल, राजकीय पक्षाकंडून गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो, तसे काही होत असेल तर पोलिस कसे शोधतील. काहीही केले तरीही महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. ते गुन्हेगाराला शोधून काढतील, असे नारायण राणे यांच्या मुलाचे नाव न घेता सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह विविध शिवसेना नेते उपस्थित होते.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT