कवीच्या अंत्यसंस्कारावेळी रिपब्लिकन, काँग्रेस कार्यकर्त्यांत धुमश्चक्री

लोककवी विनायकदादा पठारे यांच्या शोकसभेत कार्यकर्ते अमरधाममध्येच भिडले.
Congress & RPI Supporters arguments at funeral.

Congress & RPI Supporters arguments at funeral.

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : राजकीय प्रतिस्पर्ध्यांत कुठेही वाद होऊ शकतो. त्याला स्थळ, काळ असा कसलाच अपवाद नसतो. मंगळवारी येथील अमरधाममध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. एका प्रसिद्ध गीतकाराच्या अंत्यसंस्कार समयी शोकसभेत बोलण्याच्या वादातून रिपब्लिकन पार्टी (RPI)काँग्रेस (Congress) समर्थकांत असा वाद पहायला मिळाला. हा वाद अगदी हातघाईवर गेल्याने पोलिसांत तक्रारी झाल्या.

<div class="paragraphs"><p>Congress &amp; RPI Supporters arguments at funeral.</p></div>
शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे!

शोकसभेत उपस्थित राहिले आणि जुन्या वादाची कुरापत काढून मारहाण केल्याप्रकरणी माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, (Shivsena) यांसह अन्य दहा जणांवर भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Congress &amp; RPI Supporters arguments at funeral.</p></div>
ठेकेदार पळाला; धुळेकरांचा जीव धोक्यात!

प्रसिद्ध लोककवी, गीतकार विनायकदादा पठारे यांचे रविवारी (ता. २६) निधन झाले. सोमवारी जुने नाशिकमधील अमरधाममध्ये दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शोकसभेत जुन्या वादाची कुरापत काढून तसेच याठिकाणी उपस्थित का राहिले, या कारणातून दोन गटांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चक्क अमरधाममध्ये फ्री स्टाइल झाल्याने अंत्ययात्रेसाठी आलेल्या नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.

विक्रांत अनिल गांगुर्डे याने माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, जयेश लक्ष्मण सोनवणे, अनिकेत ऊर्फ पप्पू बाळू गांगुर्डे, राहुल दिवे यांचा वाहनचालक, अशा सहा जणांनी मृत पठारे यांच्या शोकसभेतून निघून जाण्यास सांगितले. तेथून न गेल्याचा राग मनात धरून विक्रांत गांगुर्डे, अनिल गांगुर्डे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करत जखमी केल्याची तक्रार विक्रांत यांनी दिली, तर जयेश लक्ष्मण सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीत अनिल गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, विक्रांत गांगुर्डे, सविता गांगुर्डे, गणेश उनव्हणे, शशी उनव्हणे यांना शिवीगाळ करून अंत्यविधीसाठी असलेल्या लाकडाने आणि दगडाने मारहाण केल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, परस्पर राजकीय वर्चस्वावरून मारहाण झाल्याची चर्चा अमरधाममध्ये रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com