Gokul Daund Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sugarcane Price Agitation: 'तीन हजारांच्या पुढे भाव न मिळाल्यास ऊसतोड थांबवणार'; भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

BJP leader Gokul Daund : उसाच्या दरावरून अहमदनगरमध्येही राजकारण तापणार ?

Pradeep Pendhare

Ahmednagar News: पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील ऊस कारखानदारांनी इतर कारखान्यांप्रमाणे प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर शेतकऱ्यांना द्यावा, त्याचप्रमाणे ऊस मोजणी काटासंदर्भात विविध तक्रारी पाहता उसाची मोजणी इतरत्र तालुक्यात कुठेही करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केली आहे. या संदर्भात लवकरच दौंड हे प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे.

दौंड म्हणाले, "पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील ऊस कारखान्यांनी उसाचे दर निश्चित करून या कारखानदारांनी शेतकऱ्याला न्याय द्यावा, तीन हजार रुपयांच्या पुढे उसाला प्रतिटन भाव द्यावा, अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखानदार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची ऊस मोजणीसह दरामध्ये आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याचे मुख्य कारण आहे. या दोन्ही तालुक्यांतील कारखानदाराची ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन उसाचे दर साखर आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे जाहीर करावेत", असेही दौंड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्यातील इतर साखर कारखान्यांनी उसाला एफआरपीप्रमाणे व उसाची रिकव्हरी योग्य त्याप्रमाणे दर देण्यात यावा, किमान तीन हजार रुपये दर प्रतिटन जाहीर करावा, महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांनी प्रतिटन साडेतीन हजार रुपये असून, फक्त पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतीलच साखर कारखानदारांनी उसाचे दर कमी दिले आहेत. अशा पद्धतीने आर्थिक फटका शेतकऱ्यांना देण्याचे काम या कारखानदारांनी केले आहे.

आर्थिक फटक्याबरोबर ऊस मोजणी काट्यासंदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्याने यामध्ये ऊस मोजणी करताना मोठी तफावत आढळून आली आहे. कारखान्याच्या ऊस मोजणी काट्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या मोजणीबाबत पिळवणूक केली जाते. ऊस उत्पादक शेतकरी तालुक्यातील कोणत्याही वजनकाट्यावर वजन करू शकतात. यामुळे ऊस कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी," असेही गोकुळ दौंड यांनी म्हटले आहे.

याबाबत मुख्यमंत्री, साखर आयुक्त साखर आयुक्त, जिल्हा प्रशासन यांनी लक्ष घालून शासन निर्णयानुसार व महाराष्ट्रात जाहीर केलेला दर पाथर्डी-शेवगाव तालुक्यामध्ये वाढून मिळणेबाबत मागणी करण्यात येणार आहे. कारखानदारांनी उसाचे दर तीन हजारांच्या पुढे निश्चित न केल्यास येत्या आठ दिवसांत तालुक्यातील ऊसतोड थांबवून शेतकरी सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची भूमिका गोकुळ दौंड यांनी घेतली आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT