Ganesh Dhatrak in Shivsena meeting, Nashik Latest Marathi News, Suhas Kande News
Ganesh Dhatrak in Shivsena meeting, Nashik Latest Marathi News, Suhas Kande News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सुहास कांदे एकटे पडले, कार्यकर्ते शिवसेनेसोबतच!

Sampat Devgire

मनमाड : शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांपैकी एक सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघातील मनमाडमध्ये शिवसेनेच्या आजी- माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. जोरदार घोषणाबाजी करीत बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत. आमची निष्ठा शिवसेनेशी आहे, अशी भूमिका शिवसैनिकांनी व्यक्त केली. (Shivsena leaders are firmly support Uddhav Thakre)

दरम्यान, यावेळी शहरात २९ जूनला रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, याचे पडसाद ग्रामीण भागातही उमटायला लागले आहेत. या बंडखोर आमदारांमध्ये नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा समावेश आहे. आमदारांनी केलेल्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मनमाडमध्ये सर्व आजी- माजी शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत देवी मंदिरात माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली.(Nashik Latest Marathi News)

माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, शिवसेना नेते अल्ताफ खान, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहरप्रमुख मयुर बोरसे, वकील संघाचे अध्यक्ष एक सुधाकर मोरे, खालिद शेख आदींनी आपल्या भाषणात पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन देत पाठिंबा दर्शविला.

एकही आमदार शिवसेनेसोबत नसले तरी आमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत सदैव आहेत. बंड कितीही होऊ द्या, पुन्हा नव्याने शिवसेना पक्ष उभा राहील. पक्षाला पाठबळ आम्ही देऊ, कोणी येऊ कोणी जाऊ आम्हाला काहीही देणे घेणे नाही, असा इशाराच बैठकीत देण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ नेते हरीश असर, गोविंद रसाळ, माजी नगरसेवक प्रवीण नाईक, कैलास गवळी, महेंद्र शिरसाट, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, सुनील हांडगे, मायकल फर्नांडिस, माधव शेलार, अमीन पटेल, जाफर मिर्झा, अमोल दंडगव्हाळ, सनी फसाटे, स्वराज देशमुख, संजय कटारिया, दिनेश केकान, संतोष जगताप, कयाम सय्यद, महिला शहराध्यक्ष सुरेखा मोरे, किरण शिंदे, मुक्ता नलावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT