संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करीत बंडखोरांचे समर्थन

शहरप्रमुख सूरज परदेशी यांनी केले आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थन
Shivsena workers burn Sanjay Raut icon
Shivsena workers burn Sanjay Raut iconSarkarnama
Published on
Updated on

सावदा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ३५ पेक्षा जास्त आमदारांसह शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड केले. त्यानंतर कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था होती. परंतु आता शिवसैनिक हळूहळू आपली भूमिका स्पष्ट करू लागले आहेत. त्यामुळे दोन गट पडले असून, शहरप्रमुख सूरज परदेशी आणि त्यांच्या समर्थकांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा निषेध केला. राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. पाळधी येथेही गुलाबराव पाटील यांचे समर्थन करण्यात आले. (Shivsena rebelilon followers protest against Shivsena leaders Sanjay Raut)

Shivsena workers burn Sanjay Raut icon
बंडूकाका बच्छाव बंडखोर दादा भुसेंचे राजकारण विस्कटवणार?

शिवसेनेचा ढाण्या वाघ समजले जाणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याने येथील शिवसैनिकांमध्ये सुरवातीस संभ्रम होता. आपण आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच असल्याचे शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Shivsena workers burn Sanjay Raut icon
शिवसेना बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु!

सोमवारी संजय राऊत यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला. या वेळी त्यांच्यासोबत मनीष भंगाळे, गणेश माळी, नीलेश खाचणे, वेडू लोखंडे, बंटी लोखंडे, नितीन चौधरी, गोटू खान, गुलाम शेख, धनराज कुंभार, आकाश बोयत, अशरफ तडवी, शाहरुख तडवी, चेतन माळी आदी उपस्थित होते. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. डी. इंगोले, पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

आम्ही ठाकरेंसोबत : नेहेते

पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे दुसरे शहरप्रमुख भरत नेहेते, संघटक नीलेश खाचणे, शरद भारंबे, माजी नगरसेवक आणि तालुका उपप्रमुख लाला चौधरी, श्‍यामकांत पाटील, माजी शहरप्रमुख व विधानसभा क्षेत्रप्रमुख मिलिंद पाटील, गौरव भैरवा, गणेश माळी, राजेंद्र माळी, मनोज माळी यांच्यासह बरेच शिवसैनिक हे असल्याचे दिसत आहे. शिंदे समर्थकांनी पुढे येऊन निषेध नोंदविला आहे. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बंडखोरांविरुद्ध निदर्शने करणार की नाही, असा प्रश्न ठाकरे समर्थक शिवसैनिकांना विचारला असता निषेध व्यक्त करणाऱ्यांव्यतिरिक्त आता जे उरलेले आम्ही सर्व शिवसैनिक हे अर्थातच पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com