Nandgaon Suhas kande & Sameer Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhas Kande Politics: नांदगावमध्ये दिवसभर सुरू होते राडे, धमक्या अन् धमक्यांचे सत्र...

Suhas Kande; Ex MP Sameer Bhujbal & MLA Suhas kande political fight reach a low level-नांदगाव मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रीयेदरम्यान आज उमेदवारांचा तोल व भाषा घसरल्याचे चित्र होते.

Sampat Devgire

Bhujbal Vs Kande News : जिल्ह्याच्या निवडणुकीत आज नांदगाव मतदारसंघातील वाद-विवाद आणि राडा वादाचा विषय ठरला. त्याचा मतदानावर देखील परिणाम झाला. त्यामुळे भुजबळ आणि कांदे यांच्यातील परंपरागत राजकीय वाद आज अक्षरशः शत्रुत्वाच्या स्तरावर घसरल्याने प्रशासन दिवसभर या मतदारसंघावरच लक्ष ठेऊन होते.

जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव बाह्य आणि येवला मतदारसंघात मतदानाच्या दिवशी वाद विवाद होणार हे सगळ्यांनाच अपेक्षित होते. मात्र आज दिवसभर ज्या घटना घडल्या, त्यात शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात दिवसभर वाद रंगला. उमेदवारांनी केलेले आरोप, प्रत्यारोप आणि भाषेचा स्तर यांने निवडणुकीची राजकीय पातळी घसरली हे स्पष्ट झाले. जिल्ह्यात तो चर्चेचा विषय होता.

नांदगाव शहरात बंजारा समाजाचे व ऊसतोड कर्मचारी एका हॉलमध्ये डांबून ठेवल्याची तक्रार होती. त्यामुळे माजी खासदार समीर भुजबळ तेथे गेले. त्यांनी या लोकांची ओळख पटविल्याशिवाय मतदान करू देण्यास नकार दिला. त्यामुळे या मजुरांना बाहेर पडण्यावरून राडा झाला. यावेळी आमदार कांदे यांनी माजी खासदार भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्याला भुजबळ यांनी देखील त्याच भाषेत उत्तर दिले.

साकोरा हा मराठा महासंघाचे उमेदवाक डॉ रोहन बोरसे यांचे गाव आहे. तेथे अज्ञात वाहनातून काही लोक आले. ते मतदारांना पैसे वाटत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ग्रामस्थ जमले. कार्यकर्त्यांनी त्या गाडीची झडती घेण्याचा प्रय्तन केला. त्यात काही पैसे आढळल्यावर कार्यकर्त्यांनी गाडीच्या टपावर उभे राहून ते फाडले. एकच धावपळ उडाली. आरोप, प्रत्यारोप झाले. त्यामुळे मोठा वाद झाला. त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज मतदानाच्या वेळेस दिवसभर घडलेल्या घटनांप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

नांदगाव शहरात गुरुकृपा महाविद्यालयाजवळ आज सकाळी काही मतदारांची एकाच ठिकाणी गर्दी झाली होती. यावरून दोन उमेदवारांमध्ये झालेल्या शा‍ब्दिक चकमकीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. तसेच बाहेरील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

साकोरे गावात घडलेल्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिस बळाचा सौम्य वापर करण्यात आला. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे झाली. मतदारसंघातील घटनांवर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT