Suhas Kande, Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhas Kande Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची कोंडी करण्यात सुहास कांदे यशस्वी?

Nandgaon Constituency : नांदगाव मतदार संघात पंकज भुजबळ कोणता मार्ग स्वीकारणार याची उत्सुकता

Sampat Devgire

Suhas Kande Politics News: लोकसभा निवडणुकीत नांदगाव मतदार संघामध्ये भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांना 41 हजारांची लीड मिळाली. या लीडने आमदार सुहास कांदे यांचे स्थान भक्कम झाले आहे.

भाजपच्या डॉक्टर पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र त्यांना नांदगाव मध्ये 41 हजारांचे मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी या आघाडीचे राजकीय मायलेज घेतले. त्यामुळे विधानसभेसाठी आमदार कांदे यांचे स्थान भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भारती पवार(Bharti Pawar) यांना एक लाख तीन हजार मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना 61 हजार 336 मते मिळाली. या मतांचे वैशिष्ट्य म्हणजे मनमाड शहरात भगरे यांना तर मालेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांमध्ये भारती पवार यांना लक्षणीय मते मिळाली.

नांदगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला आमदार कांदे यांनी तेरा हजारांचे मताधिक्य घेऊन माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर आमदार कांदे मतदासंघांत साम-दाम-दंड भेद या सर्व नितीचा वापर करून भुजबळ समर्थकांचा सफाया करण्यात यशस्वी झाले. त्यांनी थेट मंत्री भुजबळ यांनाच अंगावर घेतले. त्यामुळे कांदे आपले राजकारण रेटण्यात यशस्वी ठरले.

आमदार कांदे(Suhas Kande) यांची राजकीय शैली आणि स्वभावामुळे त्यांचे सहसा कोणाशी पटत नाही, असं बोललं जातं. अगदी आपल्याच पक्षाच्या पालकमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांच्याशीही त्यांचे फारसे सख्या नसल्याचे दिसते. मात्र मधले पदाधिकारी बाजूला सारत त्यांनी थेट तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी पूल बांधला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात ते निर्धास्थ दिसतात.

या मतदारसंघात कांदे आणि भुजबळ यांच्यात थेट सामना असतो. सध्या या दोन्ही नेत्यांनी आपले मूळ पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांत पूर्वीसारखी सहानुभूती नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कांदे यांनी विरोधातील पाच पैकी संजय पवार आणि राजेंद्र देशमुख या दोन माजी आमदारांना बरोबर घेतले आहे.

या दुष्काळी मतदार संघात पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. मनमाड शहरात तो तीव्र आहे. धरणातून थेट जलवाहिनीद्वारे योजना राबवून मनमाड चा प्रश्न सोडविण्यात कांदे() यशस्वी झाले आहेत. ती त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

पंकज भुजबळ त्यांच्याविषयी ती अनुकूलता दिसत नाही. अप्रत्यक्षरीत्या आमदार कांदे यांनी मंत्री भुजबळ(Chhagan Bhujbal) यांची या माध्यमातून राजकीय कोंडी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही कोंडी कशी फुटते याची उत्सुकता असेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT