Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांचा हट्ट केला पूर्ण..

Eknath Shinde On MLA Sujhas Kande : "४६ कोटी ७७ लाख रुपये मंजूर झाले असून, आता पालिकेला एक रुपयाही भरण्याची गरज नाही."
Eknath Shinde On MLA Sujhas Kande
Eknath Shinde On MLA Sujhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शहरासाठी जीवनदायी असलेली ३१२ कोटींची करंजवण पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर त्यासाठी पालिकेला ४६ कोटी ७७ लाख रुपये लोकवर्गणी भरावी लागणार होती. मात्र आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी पाठपुरावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून मनमाडसाठी खास बाब म्हणून हा निधी देखील मंजूर केल्याने, आता पालिकेला या योजनेसाठी एक पैसाही भरावा लागणार नाही. (MLA Suhas Kande deemands to Cm for Water supply scheme public contribution)

मनमाड शहराची पाणीटंचाई सर्वश्रुत आहे. येथील नागरिकांना पालिकेतर्फे १८ ते २२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ही पाणीटंचाई दूर व्हावी. नागरिकांना रोज पाणी मिळावे यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजना राज्य शासनाकडून मंजूर करून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. या योजनेसाठीची लोकवर्गणी राज्य शासनातर्फे भरावी अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली होती. (CM Eknath Shinde assures for Manmad Water supply scheme public contribution)

Eknath Shinde On MLA Sujhas Kande
Kolhapur News : थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर का आली जप्तीची वेळ? काय आहे प्रकरण?

या योजनेसाठी ३१२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या योजनेसाठी ३१२ कोटी रुपये मंजूर करताना मनमाड नगर पालिकेला लोकवर्गणी (स्वनिधी) म्हणून १५ टक्के अर्थात ४६ कोटी ७७ लाख रुपये भरावे लागणार होते. एव्हढी मोठी रक्कम भरण्यासाठी पालिकेची आर्थिक स्थिती नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती.

आमदार सुहास कांदे यांनी पालिकेवर कुठलाही बोजा पडणार नाही असे आश्वासन दिले होते. पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने ही रक्कम राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानांतर्गत खास बाब म्हणून मंजूर करावी, अशी मागणी आमदार कांदे यांनी राज्य शासनाकडे केली होती. यासाठी वर्षभर पाठपुरावाकेला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने मनमाड नगर पालिकेला भरावे लागणारे लोकवर्गणीचे पैसे शासनाच्यावतीने खास बाब म्हणून अनुदान मंजूर केले आहे. विशेष म्हणजे लोकवर्गणी देखील शासनाने मंजूर केलेली मनमाड नगर पालिका ही राज्यातील एकमेव पालिका आहे.

राज्य शासनाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश नगरविकास विभागातर्फे काढण्यात आला आहे. राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत पालिकेचा स्वहिस्सा भरण्यासाठी अनुदानापोटी शंभर टक्के रक्कम राज्य शासनाचा हिस्सा म्हणून मंजुरी दिली जात असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

पालिकेने तत्काळ हा निधी संबधित यंत्रणेकडे कोणत्याही प्रकारची कपात न करता वितरित करावी. ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंत हा निधी खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी दक्षता घेण्याचे आदेश आहेत.

Eknath Shinde On MLA Sujhas Kande
Police Run Away : काय सांगता ! चक्क पोलिसावरच आली पळून जाण्याची वेळ, रात्र काढली उसात; काय आहे कारण ?

याविषयी आमदार सुहास कांदे म्हणाले, "आर्थिक स्थिती नसल्यामुळे करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी मनमाड नगर पालिकेला १५ टक्के लोकवर्गणी भरणे शक्य नव्हते. विशेष बाब म्हणून अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ४६ कोटी ७७ लाख रुपये मंजूर झाले असून, आता पालिकेला एक रुपयाही भरण्याची गरज नाही. ठरलेल्या कालावधीत ही योजना पूर्ण होईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com