Ahilyanagar News, 23 Mar : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. तर महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे हे देखील पराभूत झाले होते.
लोकसभेच्या पराभवामुळे त्यांच्या नावासमोर आता माजी खासदार असा उल्लेख होत आहे. मात्र, माजी असा उल्लेख त्यांना नकोसा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे भाजप (BJP) आमदारांच्या सत्कार समारंभाच बोलताना त्यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली आहे.
नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यातर्फे जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या 8 आमदार उपस्थित होते.
या सत्कार समारंभात बोलताना माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी आपल्या पुनर्वसनाची मागणी केली. या कार्यक्रमात बोलताना विखे म्हणाले, "या स्टेजवर सगळेच 'आजी' आहेत मी एकटाच 'माजी' आहेत. आता माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं आणि माझ देखील पुनर्वसन करावं." तर विखेंनी असं वक्तव्य करताच उपस्थित सर्वांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला.
जिल्ह्यातील महायुतीच्या (Mahayuti) भरघोस यशामध्ये विखेंचा सहभाग मोठा असल्यामुळे तुमचं पुनर्वसन नक्की होईल असं आश्वासन उपस्थितांनी त्यांना दिलं. त्यामुळे आता सुजय विखेंची वर्णी नेमकी कुठे लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सुजय विखे पाटलांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला होता.
राज्यातील प्रमुख लढतीपैंकी ही एक मानली जात होती. त्यामुळे लोकसभेचा पराभव विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याचा वचपा त्यांनी विधानसभा निवडणुकीत काढल्याचं पाहायला मिळालं. कारण नगरमधील अनेक आमदारांच्या प्रचारात सक्रीय होत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.