Pratap Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांनी सगळच काढलं; म्हणाले, 'अशोक चव्हाणांसोबत असतो तर जिल्हा परिषदेवर गेलो नसतो...'

Pratap Patil on Ashok Chavan News : रविवारी नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भास्कर पाटील-खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Ashok Chavan, Pratap Chikhlikar
Ashok Chavan, Pratap Chikhlikar Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांचे वैर सर्वश्रुतच आहे. चिखलीकर आणि चव्हाण यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून आडवा विस्तवही जात नाही. त्यामुळे दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच रविवारी नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भास्कर पाटील-खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर खोचक टीका केली.

या प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रताप चिखलीकर यांनी जोरदार टीका केली. मी नेहमीच अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) विरोधात राहिलो आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मला लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. एवढेच नव्हे तर मी जर येत्या काळात अशोक चव्हाणांसोबत राहिलो असतो तर जिल्हा परिषदेवर देखील निवडून गेलो नसतो, अशी खोचक टीका त्यांनी केली.

Ashok Chavan, Pratap Chikhlikar
MVA vs Mahayuti : अधिवेशनात महायुतीची स्टॅटर्जी ठरली वरचढ; शेवटच्या आठवड्यात तरी विरोधकांना सूर गवसणार का ?

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रताप चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांनी येत्या काळात नांदेड जिल्हयातील प्रलंबित विकासकामांची यादी सांगत ही कामे पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले. येत्या काळात माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर, मी आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून पक्षाला बळकट करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Ashok Chavan, Pratap Chikhlikar
BJP Minister Jaykumar Gore : माझ्या पाठीशी 'देवाभाऊ', कुणीही वाकडं करू शकत नाही; मंत्री गोरे यांचा विरोधकांना इशारा

या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर पाटील खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे यांच्यासह माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्याला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Ashok Chavan, Pratap Chikhlikar
Nagpur Violence : धक्कादायक! महिला पोलिसाचा विनयभंगाचा दावाच CM फडणवीस खोडून काढला? स्पष्टीकरणात म्हणाले...

शंकरराव चव्हाणांनी नाही तर शरद पवारांनी मंत्री केले : खतगावकर

मला शंकरराव चव्हाणांनी नाही तर शरद पवारांनी मंत्री केले होते, अशी आठवण खतगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितली. तुमचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. तीस वर्ष झाले तुम्ही मंत्री आहात. अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे, सहावेळा उपमुख्यमंत्री आहात, अशा शब्दात या कार्यक्रमप्रसंगी बोलताना भास्करराव पाटील-खतगावकर यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Ashok Chavan, Pratap Chikhlikar
Nagpur Riots Update : फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का? ठाकरेंचा सरकारवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com