Sujay Vikhe Patil  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : सुजय विखे विधानसभेच्या मैदानात! थोरात, तनपुरे, कर्डिलेंचे टेन्शन वाढले

Pradeep Pendhare

Sujay Vikhe Patil Nes : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संगमनेर किंवा राहुरीमधून आपण उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय गणित बदलणार असल्याचे चर्चा आहे.

'मला आता वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्‍या तालुक्‍यात उमेदवारीबाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे.', असे सुजय विखे म्हणाले.

श्रीरामपूर राखीव असल्‍याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्‍याचे सुचक वक्‍तव माजी खासदार सुजय विखे यांनी माध्‍यमांशी बोलताना केले. माजी खासदार विखे यांच्या या भूमिकेमुळे संगमनेरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि राहुरीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.

शिवाजी कर्डिले यांची अडचण

तसेच भाजपचे माजी आमदार तथा नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे देखील विखेंच्या निर्णयाने टेन्शन वाढले आहे. कारण कर्डिले देखील राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत. याशिवाय श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील त्यांची चाचणी सुरू आहे. विखेंच्या वक्तव्यामुळेविधानसभा निवडणुकीला बरीच राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे-पाटीलच

सुजय विखे यांनी शिर्डी मतदार संघातून राधाकृष्‍ण विखे हेच निवडणूक लढविणार आहेत. त्‍यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्‍फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आमदार राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारीबाबत इच्‍छा व्यक्त केली असेल तर यात गैर काही नाही, असे देखील विखे म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT