Ahmednagar News : सत्ता आणि मतांच्या लाचारी पत्करल्याचे उद्धव ठाकरेंनी तीन वर्षांपूर्वीच दाखवून दिलेले आहे. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यावर डोळा ठेवला जात आहे. मात्र हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ठाकरे वारंवार तडजोड करत आहेत असा घणाघात भाजप खासदार सुजय विखे यांनी केला आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यात उत्तर भाषिक मेळाव्याच्या अयोजनावर बोलताना विखेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. (Latest Political News)
नगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार विखे म्हणाले, "स्व. बाळासाहेबांचे विचार सोडून ठाकरेंना अनेकदा तडजोड केलेली आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची विश्वासहर्ता गमावल्यानेच एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेले आणि मुख्यमंत्री झाले. भविष्यातही इतरजण ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत जातील", असे भाकित खासदार विखेंनी वर्तवले आहे.
कर्जत 'एमआयडीसी'साठी त्या-त्या काळात आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्यात वाद सुरू आहे आणि पुढेही राहील, आपणास त्यावर बोलायचे नाही, मात्र कोणीतरी इथे 'एमआयडीसी' झाल्यावर कोणते मोठे उद्योग येणार आहेत. तसे किमान तीन मोठ्या उद्योगांकडून तरी प्रस्ताव आले आहेत का, यावर बोलावे अशी अपेक्षा खासदार विखे यांनी व्यक्त केली.
विरोधकांनी 'यूपीए' नाव बदलून आता 'इंडिया' ठेवल्याबद्दलही खासदार विखेंनी विरोधकांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, "मुळात 'इंडिया' हे नाव ठेवण्यास मान्यता मिळणार नसून पंतप्रधान मोदी म्हणाले तसे 'ईस्ट इंडिया' कंपनी आणि 'इंडियन मुजाहिदीन' नावामध्येही 'इंडिया' आहे. मात्र त्यांनी देशाचे नुकसानच केले आहे. विरोधक एकत्र राहावेत म्हणून एकत्र केलेला हा एक 'फंडा' असून त्याला कसलाही 'अजेंडा' नाही. हे महाराष्ट्र आणि देश पाहत आहे", असा टोलाही विखे पाटलांनी लगावला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.