Uddhav Thackeray On BJP : विरोधात असला की 'मळ' भाजपात गेला की 'कमळ'; ठाकरेंचा एका दगडात दोन 'पक्षां'वर निशाणा

Uddhav Thackeray In Thane : ठाकरेंनी भाजपवर केलेल्या प्रहाराने अजित पवार गटही घायाळ
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Narendra Modi
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : राज्यात ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ज्यांच्यावर केला तीच मंडळी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बसणार आहेत. भ्रष्टाचारी विरोधात असले की 'मळ' आणि भाजपात गेले की 'कमळ' होतात. देशात 'कमळ' फुलवण्यासाठी भाजपला 'मळ' (भ्रष्ट लोकांची गरज) लागतोय का? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला लक्ष्य करत भाजपवर सडकून टीका केली. ठाकरेंच्या या प्रहाराने भाजपसह अजित पवार गटही घायाळ होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Narendra Modi
Loksabha Election 2024 : आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा? ताजा सर्व्हे काय सांगतो?

ठाण्यातील उत्तर भारतीय समजासाठी ठाकरे गटाचा शनिवारी मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंनी भाजप, मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधताना मतदानासाठी ते कुठल्या स्तरावर जातात याचा उलगडा केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "देशासह राज्यात भ्रष्टाचार करा आणि आमच्या गाडीत येऊन बसा अशी भाजपची योजना आहे. विरोधात असलेल्या लोकांवर 'ईडी', 'सीबीआय'द्वारे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि तुरुंगाची भीती दाखवून भाजपमध्ये घ्यायचे. असे विरोधातील भ्रष्ट लोकांचा वापर ते देशात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत."

देशातील विरोधकांवर देशद्रोह्यासारखे आरोप केले जातात. मात्र भाजप आणि स्वातंत्र्याचा काहीही संबंध नसला तरी देशप्रेमींचा ठेका घेतल्यासारखे ते वागत आहेत. देशापेक्षा कोणी मोठा नाही. एका व्यक्तीच्या नावाने आपल्या देशाची ओळख व्हायला नको. एक व्यक्ती देशाचा मालक होऊ शकत नाही. हा देश हुकूमशाहीकडे झुकत आहे. निवडणुका आल्या की धार्मिक हिंसाचार घडवून आणला जातो. लोकशाही वाचवण्यासाठी २०२४ ची निवडणूक महत्वाची आहे."

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Narendra Modi
Uddhav Thackeray News : 'नाट्यगृह आम्ही दिले, पण नाटक दुसरेच करत आहेत' : ठाकरेंचा ठाण्यातून हल्लाबोल

"आम्ही राम मंदिरासाठी कायदा बनवून राम मंदिर बनविण्याची मागणी केली होती. त्याासठी नाही मात्र लोकशाही संपवण्याची कायदे बनवले जातात. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहे. मात्र विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्यांच्या सत्तेत महिलांची अब्रु कोण वाचवणार? 'ईडी', 'सीबीआय'ला मणिपूरमध्ये पाठवा. दंगे करणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या मणिपूर शांत होईल", असा टोलाही ठाकरेंनी मोदी-शाहांवर केला आहे.

२०२४ निवडणुकीत भाजपला आता उत्तर भारतीयांनी उत्तर द्यावे, असे आवाहनही ठाकरेंनी केले. ते म्हणाले, "कोरोना काळात गंगा नदीत काय झाले हे आपण पाहिले, त्यापद्धीतीने राज्यात एकाही मृतदेहाची विटंबन होऊ दिली नाही. निवडणुका आल्या की तुमच्या मूळ गावातील लोक आणतील. तुम्हाला वाटेल की माहेरचा माणूस आला. पण त्याला भूलू नका. माझ्यावतीने त्यांना विचारा की कोरोना काळात तुम्ही कुठे होता? भाजपला आता तुम्हीच उत्तर द्या."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.