Maharashtra Politics : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने प्रशासकीय व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहे.
साहजिकच या प्रकरणाची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंतर्गत (अजित पवार गटात ) या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. नरहरी झिरवळ यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच झिरवाळ यांना कडक शब्दात समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्वतःची तसेच पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही. याची काळजी घ्यावी तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रालयात अन्न आणि औषध खात्याच्या कर्मचाऱ्याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर मंत्री झिरवाळ हे चार दिवस नॉट रिचेबल होते.
मात्र, याप्रकरणाची राज्यभर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला नरहरी झिरवाळ हजर होते. देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. त्यापूर्वी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचीही एक बैठक झाली. त्यानंतर कोअर कमिटीमधील अगदी मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत एक वेगळी बैठक पार पडली. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना स्पष्ट शब्दात समज दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर आता नरहरी झिरवाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
एका मेडिकल स्टोअरचा रद्द झालेला परवाना पूर्ववत करुन देण्याच्या बदल्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला, ही माझीही जबाबदारी आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन अशी भूमिका नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.