Nashik Politics : नाशिक महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सभेत स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे भाजपच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर संख्याबळ व गुणाकंनानुसार महापौरांनी एकुण १६ सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
दरम्यान, महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीवर भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. १६ पैकी सर्वाधिक ९ सदस्य भाजपचे नियुक्त झाले आहेत. त्यामुळे अर्थातच आर्थिक नाडी मानल्या जाणाऱ्या स्थायीसमितीच्या चाव्या भाजपकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. तरी सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे २६ नगरसेवक व मनसेच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शहर विकास आघाडी म्हणून एकत्रित नोंदणी केल्याने भाजपला फटका बसला. भाजपची एक जागा घटली. तरी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोळा सदस्यीय स्थायी समितीत सभापती पदासाठी आवश्यक असलेला ९ हा बहुमताचा आकडा भाजपकडे असल्याने सभापतीपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडे बहुमत असल्याने सभापती भाजपचाच होणार आहे. उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलेले मच्छिंद्र सानप यांचे नाव सभापतिपदासाठी आघाडीवर आहे. भाजपने ऐनवेळी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्याचा निर्णय घेतला. व मच्छिंद्र सानप यांना उपमहापौरपदाचा अर्ज माघारी घ्यायला सांगितले होते. त्याठिकाणी शिवसेनेच्या विलास शिंदे यांना उपमहापौर म्हणून संधी देण्यात आली. सानप यांनीही कोणतीही तक्रार न करता पक्षादेश पाळला होता. परंतु आता मच्छिंद्र सानप यांना स्थायीवर पाठवत भाजपने त्यांची नाराजी दूर केली असून सभापती पदासाठी देखील त्यांचाच विचार होईल असा अंदाज आहे.
मच्छिंद्र सानप यांच्या बरोबरच माधुरी बोलकर, डॉ. दीपाली कुलकर्णी यांचेही नाव शर्यतीत आहे. परंतु उपमहापौरपदावरुन ऐनवेळी वंचित राहिलेले सानप हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शिवाय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सभापतिपदाची संधी पंचवटी विभागाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील दहा दिवसात सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
नाशिक मनपाच्या स्थायी समितीवरील नवनियुक्त सदस्य पुढील प्रमाणे
भाजप - (९)
माधुरी बोलकर
नितीन निगळ
पल्लवी गनोरे
दीपाली कुलकर्णी
इंदूबाई खेताडे
आदिती पांडे
सरिता सोनवणे
जयश्री गायकवाड
मच्छिन्द्र सानप
अजित पवारांची राष्ट्रवादी -(०१)
मुकेश शहाणे ( अपक्ष )
शिंदेंची शिवसेना - (०४)
मयुरी पवार ( मनसे )
किरण गामने
राहुल दिवे
रंजना बोराडे
ठाकरेंची शिवसेना - (०२)
योगेश गाडेकर
भारती ताजनपुरे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.