Sunetra Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Merger : सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल? आदित्य तटकरेंनी स्पष्टच सांगितले, 'नकारात्मक भूमिका...'

Aditi Tatkare On NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची भूमिका काय आहे, या विषयी आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Sampat Devgire

NCP Merger News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरण हा राजकीय चर्चेचा विषय आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावरून सातत्याने परस्पर विरोधी वक्तव्य होत असतात. दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विलीनीकरणासंदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जळगाव येथे माध्यमांशी बोलताना मंत्री तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विधान केले. त्या म्हणाल्या, 'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अथवा पक्षनेते पार्थ पवार यांनी विलीनीकरणाबाबत नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. या संदर्भात तथ्यहीन आरोप होत आहेत.'

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून विलीनीकरण हा विषय चर्चेत नाही, असे वारंवार बोलले जात होते. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या स्थितीत दोन्ही पक्षांचे विलीनीकरण हा चर्चेचा विषय बनला आहे.

सरकारचे काम उत्तम

अदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करीत आहे. लाडकी बहीण योजना हे सरकार कधीही बंद करणार नाही. विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक या योजनेबाबत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी टीका त्यांनी केली.

मंत्री तटकरे अमरावतीच्या दौऱ्यावर निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद केला. यावेळी पक्षाचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार राजू मामा भोळे, रावेत लोकसभा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष योगेश नेमाडे, युवती शाखेच्या अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचं विविध नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT