Akola News, 26 Jul : अकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
शेख मोहसीन यांच्या कुटुंबियांनी हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असं म्हणत थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप केला आहे. मंगेश काळे यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी शेख यांचे कुटुंबीय रात्री खदान पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.
नेमकं काय घडलं?
२३ जुलै रोजी संध्याकाळी अकोल्यातील नेहरू पार्क येथ शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या दुचाकीला एका चारचाकीने धडक दिली. या अपघातात मोहसीन गंभीर जखमी झाले. तर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मात्र, हा अपघात नसून हत्येचा सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप शेख कुटुंबीयांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीच हा अपघात घडवून आणल्याचा आरोप शेख यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. या आरोपांमुळे आता अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
मंगेश काळे हे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत. सध्या त्यांच्या पत्नी सुरेखा काळे या नगरसेविका आहेत. शेख याच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप हा अपघात की सुनियोजित घातपात आहे याबाबातची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. मात्र, शेख यांच्या कुटुंबियांच्या आरोपांमुळे अकोल्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.