Sunil Bagul and Mama Rajwade join BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : बागुल, राजवाडे आत.. आता भाजपने लावला हाउसफुल्लचा बोर्ड

Sunil Bagul and Mama Rajwade join BJP : सुनील बागूल व मामा राजवाडे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रविवारी पार पडला. त्याचवेळी गिरीश महाजन यांनी सुनील बागुल यांना तंबी दिल्याचे पाहायला मिळाले.

Ganesh Sonawane

Nashik BJP Politics : सुनील बागूल व मामा राजवाडे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रविवारी पार पडला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दोघेही मोठे शक्तीप्रदर्शन करत भाजपमध्ये दाखल झाले. त्याचवेळी गिरीश महाजन यांनी सुनील बागुल यांना तंबी दिल्याचे पाहायला मिळाले. तसेच भाजपमध्ये आता जागा हाउसफुल्ल झाल्याचे सांगितले.

या पक्ष प्रवेशावेळी गिरीश महाजन म्हणाले की, राज्यभरात विरोधी पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेशकर्त्यांचा ओघ वाढतो आहे. त्यामुळे आता पक्षात जागा हाउसफुल्ल झाली. माजी आमदार वसंत गिते यांना आपल्याला पक्षात घ्यायचे नाही. त्यांना कोणत्याही स्थितीत भाजपमध्ये घेतले जाणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे सुनिल भाऊ हा तुमचा शेवटचा पक्ष प्रवेश आहे. पुन्हा इकडे-तिकडे जायचे नाही, या शब्दांत महाजन यांनी बागुलांना तंबी दिली.

नाशिकच्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी बागुल व राजवाडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अक्षय बागुल, शंभू बागुल, भगवंत पाठक, गुलाब भोये यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.

यावेळी सुनील बागुल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करणे आता सोपे राहिले नाही. बॅकग्राउंड, पोलिस रेकॉर्ड सर्व काही तपासून प्रवेश दिला जातो. महाजन यांच्याशी जेव्हा भाजपात प्रवेश करण्यासाठी संपर्क केला, तेव्हा त्यांनी प्रथम पक्षाचे स्थानिक आमदार, पदाधिकारी व आरएसएसचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का म्हणून विचारणा केली. त्यावर मी परवानगी घेऊन आलो आहे, असे सांगितले. त्यामुळे भाजपात प्रवेश झाल्याने एमपीएससी परीक्षा पास झाल्यासारखे वाटत आहे असं बागुल म्हणाले.

महाजन यांनी यावेळी 122 पैकी 100 जागांचा आकडा आपल्याला गाठायचा आहे. जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीत सत्ता आणायची आहे. त्यासाठी सज्ज व्हा. तसेच येणारा कुंभमेळा देखील सुरक्षितपणे पार पाडायचा आहे असं सांगितलं. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, जळगावचे आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री बबनराव घोलप, बाळासाहेब सानप, भिकुबाई बागुल, लक्ष्मण सावजी, सुनील केदार, सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT