Sunil Tatkare Sarakarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunil Tatkare : 'पक्ष विस्तारात जुने बाजूला करू नका'; जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रदेशाध्यक्ष तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले....

Sunil Tatkare at NCP Shirdi Shibir : शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात राज्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांच्या पक्ष विस्ताराच्या भूमिकेवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मोठी प्रतिक्रिया

Pradeep Pendhare

NCP Shirdi Shibir News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील नवसंकल्प शिबिराचा पहिला दिवस राज्यातून आलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी गाजवला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात चांगले यश मिळाला आहे. त्यामुळे राज्यभरातून पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी काम केले, त्यांना बाजूला करून थेट पक्षात प्रदेश पातळीवरून प्रवेश देऊ नका, अशी मागणी जिल्हाध्यक्षांनी शिबिरात केली.

तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी देखील पत्रकार परिषदेत या मागणीला दुजोरा दिला. तसंच राज्यातील पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या भावना घेऊनच पक्षप्रवेशाचे निर्णय घेतले जातील. परंतु पक्ष विस्ताराचा देखील विचार करावा लागेल, अशी सांगड घालून पक्षप्रवेशाचे निर्णय घेतले जातील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी नवसंकल्प शिबिराचा पहिल्या दिवसाचा आढावा पत्रकार परिषदेत मांडला. त्यावेळी राज्यातील जिल्हाध्यक्षांनी होणाऱ्या नवीन पक्षप्रवेशाबाबत विचारात घ्यावे, समन्वय साधाव, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्षांची भावना बरोबर जरी असली, तरी महायुतीत राहून पक्ष विस्ताराच्या धोरणावर विचार करावा लागणार आहे. पक्ष विस्तारात जिल्हाध्यक्षांना बरोबर घेतले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

'राज्यातून आलेल्या जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचा राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात, असा आग्रही धरला आहे. परंतु याबाबत पक्ष नेतृत्व आणि महायुती समन्वय साधून निर्णय घेतला जाईल', अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.

पक्ष सदस्य नोंदणीची जिल्हाध्यक्षांवर जबाबदारी -

राज्यात पक्ष विस्तार करत असताना काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षसह अनेक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपर्कात आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. जिल्हाध्यक्षांना पक्ष सदस्य नोंदणी करायची आहे. राज्यात 31 मार्चपर्यंत पक्ष सदस्य नोंदणी सुरू राहणार आहे. त्याचा वेळोवेळी प्रदेश पातळीवरून आढावा घेतला जाईल. त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वावर निर्णय देखील होऊ शकतो, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती लवकरच -

पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीबाबत सुनील तटकरे यांनी त्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत, असे सांगून याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही. परंतु पुढील दोन दिवसात पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती जाहीर होतील, असेही सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT