Hyderabad Metro Video : धडधडतं हृदय अन् हैदराबाद मेट्रोने केली '13-13-13'ची कमाल; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

Hyderabad Metro run with Live Heart : या कौतुकास्पद कामगिरीसाठी हैदराबाद मेट्रोची प्रत्येकजण स्तुती करत आहे, कारण..
Hyderabad Metro
Hyderabad Metrosarkarnama
Published on
Updated on

Hyderabad Metro Ran to save the patient : हैदराबाद मेट्रो रेल्वेने एक कौतुकास्पद कामगिरी केली अन् सर्वांचीच मनं जिंकली. हैदराबाद मेट्रोची प्रत्येकजण स्तुती करत आहे कारण, एका हृदय रूग्णाचा जीव वाचण्यासाठी मेट्रोन ग्रीन कॉरिडॉर बनवून 13 स्टेशनवरून 13 मिनिटांत 13 किलोमीटरचे अंतर कापले.

हैदराबाद मेट्रोन एका दात्याचे हृदय जलद आणि विना अडथळा नियोजित ठिकाणी पोहचवण्यासाठी ही कामगिरी केली. 17 जानेवारी रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी बनवण्यात आलेल्या या कॉरिडॉरच्या मदतीने एलबी नगरच्या कामिनेनी रूग्णालयातून ग्लेनीगल्स ग्लोबल रुग्णालय लाकडी पूल पर्यंत दात्याचे हृदय पोहचवले गेले, यामुळे बराच वेळ वाचला.

हैदराबाद मेट्रो(Hyderabad Metro) रेल्वेने हा प्रयत्न तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णालय अधिकाऱ्यांच्या सोबत मिळून नियोजनबद्धरित्या यशस्वी केला. हे सर्व काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पार पडलं.

Hyderabad Metro
Halwa Ceremony History : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी 'हलवा' का बनवला जातो, काय आहे याचा इतिहास?

तर मेट्रोने(Metro) सांगितले की, एल अ‍ॅण्ड टी मेट्रो रेल्वे(हैदराबाद) लिमिटेड आपत्कालीन सेवांसाठी सदैव पुढे राहते आणि आपल्या जागतिकस्तरीय पायाभूत सुविधांचा वापर करून समाजकल्याणासाठी योगदान देत असते.

हैदराबाद मेट्रोच्या या कामगिरीची सर्वत्र कौतुक होत आहे. हैदाराबादेतील प्रचंड रहिवशी लोकसंख्येसह, वाहतूक गतिशीलता हा देखील महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. अशावेळी हैदराबाद मेटो रेल्वे बऱ्याचप्रमाणात वाहतूक कोंडी आणि प्रदूषण वाढीला आळा घालते. शिवाय संपूर्ण हैदराबादमध्ये आरामदायक प्रवासाची प्रवाशांना सुविधा प्रदान करते. यामध्ये मेट्रो कोच कुशल एअर कंडीशनिंग आणि व्हेंटिलेटरने सुसज्ज आहे. याशिवाय प्रत्येक ट्रेनमध्ये 126 प्रवाशांना बसण्याची क्षमता आहे, तर पूर्ण क्षमता ज्यामध्ये बसणे आणि उभा राहणे दोन्ही मिळून एक हजार प्रवासी प्रवास करू शकतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com