Sunil Tatkare News : भाजपच्या नगर जिल्हा विभाजनाच्या मुद्याची हवाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढून टाकली. 'नगर जिल्हा विभाजनाचा आजतरी कोणताही अजेंडा सरकार समोर नाही', असे सुनील तटकरे सांगत भाजपची एकप्रकारे कोंडी केली.
सुनील तटकरे नगर उत्तर दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करा, अशी मागणी लावून धरली. कार्यकर्त्यांच्या या मागणीनंतर देखील सुनील तटकरेंनी यावर अधिक आणि स्पष्ट बोलण्यास टाळलं.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा श्रीरामपूर इथं झाला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते. भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे पालकमंत्री असताना नगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा लावून धरला होता.
भाजपचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील यावर काम केले. परंतु सुनील तटकरे यांनी भाजपच्या या मुद्याची आजच हवाच काढून टाकली. 'नगर जिल्हा विभाजनाचा आजतरी कोणताही अजेंडा सरकार समोर नाही', असे सुनील तटकरे यांनी सांगून टाकले. कार्यकर्त्यांनी आग्रह करून देखील सुनील तटकरे यांनी यावर अधिक स्पष्ट बोलणे टाळले.
लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीत कांदा, सोयाबीन, कपाशीचे बाजारभाव यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे फटका बसल्याचा प्रश्न उपस्थित केला असता शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे सरकारला गांभीर्य असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. यासंदर्भात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.
तसेच एनडीएच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशी सर्वांच्या एकत्रित बैठकीत शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा करण्यात आली. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत राज्य सरकारची स्पष्ट भूमिका दिसून येईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
समन्यायी पाणी वाटपासंदर्भात सुनील तटकरे म्हणाले, "चार वर्षे जलसंपदा विभागाचा कारभार सांभाळा आहे. नगर व नाशिक हे दोन्ही जिल्हे कृषी उत्पादनात खूप वरच्या पातळीवर आहेत, अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान सरकार करणार नाही. समन्यायी पाणी वाटपामुळे नगर व नाशिकवर अन्याय होऊ दिला जाणार नाही".
पश्चिम वाहिन्याचे पाणी वळविणे तसेच नारपारची योजना व इतर योजनांमधून ठाणे आणि नाशिक परिसर जलसाठे निर्माण करून, कृष्णाखोऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्याची तूट कशी भरता येईल याचा अभ्यास राज्य सरकार विचार करत आहे. या योजनेला कितीही निधी लागला तरी सरकार तो देणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला अनेक कंगोरे आहेत. विरोधकांनी कशा आवई उठविल्या ते सर्वश्रृत आहे. संविधानाच्या प्रश्नांवरून अल्पसंख्याक समाजात वेगळ्या भावना निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले.
पराजयाची अनेक कारणे असू शकतात. तसेच सहानुभूती एकदाच मिळते, त्यामुळे यापुढे महायुतीच्या मागे महाराष्ट्राची जनता उभी राहील, असा विश्वासही सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.