Sujay Vikhe Patil : भाजपचे पराभूत उमेदवार विखेंना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लढत न्यायालयाच्या दिशेनं?

Sujay Vikhe Demand For EVM And VVPAT Inspection : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. मतदारसंघातील लढत न्यायालयाच्या दिशेने चालल्याची चर्चा रंगली आहे.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama

Sujay Vikhe News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. खासदार विखे यांच्या या मागणीचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह प्रतिस्पर्धी उमेदवार खासदार नीलेश लंके यांच्या गोटात तणाव पसरला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची ही राजकीय लढाई निवडणूक निकालानंतर देखील न्यायालयाच्या दिशेने निघाल्याचे दिसते.

नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये, याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्क देखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, राहुरी येथील 5, अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी सुजय विखे यांनी केली आहे.

Sujay Vikhe Patil
Nilesh Lanke : 'जायंट किलर' लंके म्हणतात, विखे कुटुंबाचा अभिमान; त्यांच्याकडे जाणार अन् म्हणणार,'आशीर्वाद द्या..'!

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला. ही निवडणूक विखे आणि लंके होत होती तरी, महायुती आणि महाविकास आघाडीत अतिशय चुरशीची लढत झाली. दरम्यान सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने सुजय विखे यांनी 10 जूनला निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

Sujay Vikhe Patil
Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांचा विखेंच्या पराभवावर मोठा गौप्यस्फोट; आता लढाई विधानसभेची...

सुजय विखे यांचा हा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे जाईल. 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर, न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com