Girish Mahajan| Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Demand: अजित पवार वाढवणार भाजपची डोकेदुखी, उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक जागांची मागणीच्या हालचाली!

Ajit Pawar Demands More Seats in North Maharashtra: प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चाचणीसाठी सुरू आहे दौरा.

Sampat Devgire

North Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जळगावला आणि आज धुळे येथे आढावा बैठक होत आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने राज्यभर विस्तार करण्याचे ठरविले मात्र त्यांचा फोकस प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिले. या विभागात राष्ट्रवादीला मोठा जनाधार असल्याने जास्तीत जास्त जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या चारही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनात्मक विस्तारावर भर देण्यात येत आहे. प्रतिस्पर्धी पक्षांतील अनेक नेत्यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने जळगाव, धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार मंत्री आहेत. जळगाव जिल्ह्यात पक्षाला विस्तार करण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागा वाटपात हा पक्ष भाजपची अडचण ठरू शकतो.

या संदर्भात प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वाधिक जनाधार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या दृष्टीने महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा मिळविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले होते.

धुळे, जळगाव महापालिका आणि जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य होते. सर्वाधिक इच्छुक आणि नेत्यांची गर्दी भाजपमध्ये आहे. अशा स्थितीत भाजपकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष वाटेकरू म्हणून प्रबळ होऊ लागला आहे.

ही स्थिती भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT