Rajabhau Waje Politics: शिवसेना कार्यकर्त्यांचा कारखाना, प्रस्थापित गेले तरी नवे कार्यकर्ते घडतील, ते सत्तेविरोधात लढतील!

Shiv Sena Continues to Build New Political Workers: आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना नव्या नेतृत्वाला संधी देऊन आव्हानावर मात करील.
Rajabhau Waje
Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सत्ताधारी महायुतीने सातत्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर हल्ले केले आहेत. तिच्या माध्यमातून नेत्यांना फोडले जाते आहे. मात्र या स्थितीतही शिवसेना निष्ठावंतांच्या बळावर भक्कम राहील, असा दावा खासदार राजाभाऊ वाजे यांनी केला आहे.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विविध प्रयोग करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्थितीत आगामी राजकीय धोरण काय असेल याबाबत खासदार वाजे यांनी आपली भूमिका मांडली.

खासदार वाजे म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहे. आजवर राज्यातील अनेक प्रस्थापित नेते याच पक्षाने दिले आहेत. सध्या अनेक प्रस्थापित आणि मतदारांवर पकड असलेले नेते पक्ष सोडून जात आहेत. त्याने पक्षाला काही प्रमाणात हानी होईल, मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष दिमाखातच उभा राहील.

Rajabhau Waje
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांच्या मनात आहे तरी काय? निष्ठावंतांच्या उमेदवारीचा भार आता आमदारांवर?

रोज सातत्याने बातम्या येतात की, शिवसेनेचा बुरुज ढासळला. रोज बुरुज ढासळल्याच्या बातम्या कानावर पडतात. मात्र शिवसेनेचा बुरुज भक्कम उभा आहे. म्हणूनच तर रोज बुरुज ढासळल्याच्या बातम्या येतात. त्यामुळे या बातम्यांमध्ये किती वास्तव आणि सत्यता आहे हे तपासण्याचे गरज आहे.

कोणीही डेरेदार आणि फळांनी लगडलेल्या झाडावरच दगड मारत असतात. बाभळीच्या झाडावर कोणीच दगड मारत नाही, हे समजून घेतले पाहिजे. शिवसेना बहरलेला आणि डेरेदार वृक्ष आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ताधारी आणि शिवसेना विरोधी या पक्षावर तुटून पडले आहेत.

नाशिक शहरात शिवसेनेच्या विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष प्रवेश केला आहे. त्या नेत्यांचे त्यांच्या त्यांच्या भागात वर्चस्व होते, हे नाकारता येणार नाही. मात्र शिवसेनेत अनेक नव्या तरुणांना नेतृत्व बहाल करण्याची क्षमता आहे. मला मी निवडणुकीत नव्या दमाच्या तरुणांना घेऊन हा पक्ष निवडणुकांना सामोरे जाईल. केवळ शिवसेनेतच नव्या दमाच्या तरुणांना वाव आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना विविध भागात जाऊन आढावा बैठका घेत आहे. पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिका निवडणुका जाहीर होईपर्यंत वातावरण निश्चितच बदललेले दिसेल, असा विश्वास खासदार वाजे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com