Anuradha Nagawade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : अजितदादांची रणरागिनी थांबेना; नागवडेंच्या तयारीने भाजपच्या खेम्यात अस्वस्थता?

NCP Anuradha Nagawade is preparing for elections while she is a BJP MLA in Shrigonda Constituency : श्रीगोंदा मतदारसंघात भाजप आमदार आहे. तरी देखील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांनी जनसंवाद यात्रेतून तयारी केली आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : श्रीगोंदा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या सर्वांनीच तयारीचा जोर दाखवण्यास सुरवात केली आहे. परंतु यात अनुराधा नागवडे यांची तयारी लक्ष वेधून घेते.

नागवडे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून महायुतीचे घटक असले, तरी 'विकास हवा, तर आमदार नवा', अशी टॅगलाईन घेऊन तयारीला लागलेत. त्यामुळे नागवडे आमदारकीसाठी कोणते राजकीय गणित आखतात, याकडे लक्ष लागले आहे. नागवडे यांच्या या तयारीने भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या खेम्यात अस्वस्थता पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीत (Election) कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच इच्छुकांची आपापल्या मतदारसंघात चाचपणीत गुंतलेत. अहमदनगर जिल्हा हा सहकारातील राजकारणासाठी राज्यात ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यामधील राजकीय घडामोडीचे पडसाद राज्याच्या राजकारणात नेहमीच उमटतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्याने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्याचा कौल कोणाच्या बाजूने, असेल याची उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्यांनी आपापल्या मतदारसंघात जोरदार चाचपणी सुरू केली.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा कारखानदार, बागायतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचे लक्ष असते. परंतु राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे पेच प्रसंग उद्भवलेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. श्रीगोंद्यामध्ये देखील तिच परिस्थिती आहे. महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून अनुराधा नागवडे इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. परंतु या मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार असल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.

अनुराधा नागवडे यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू असून, 'विकास हवा, तर आमदार नवा', अशी टॅगलाईन घेऊन त्या मतदारांसमोर जात आहे. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा यासाठी देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची बोलले जाते. या विधानसभा निवडणुकीत नागवडे कुटुंब कोणती राजकीय गणितं आखतात, याकडे देखील लक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन चर्चेत आले. महाविकास आघाडीमध्ये असणारे काँग्रेसचे घनश्याम शेलार यांनी देखील गावोगावी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील तिकीट मिळवण्याची रस्सीखेच दिसते. काँग्रेसने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT