Ahmednagar Politics : आमदार राजळे समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद

Controversy during voting within the BJP party for candidacy in Shevgaon-Pathardi Assembly Constituency : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण असावा यासाठी पक्षातंर्गत राबवलेल्या मतदान प्रक्रियेवेळी गोंधळ झाला.
 MLA Monika Rajale
MLA Monika RajaleSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी पक्षातंर्गत मतदान घेण्याची प्रक्रिया राबवणं भाजपला काही ठिकाणी चांगलीच अंगलट येऊ लागली आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार समर्थक आणि भाजप पदाधिकारी गटामध्ये हा वाद उफळला.

आमदार मोनिका राजळे समर्थक गट आणि भाजप पक्षाचे पदाधिकारी, अशी दोन गट एकमेकांना भिडले. त्यामुळे पक्ष निरीक्षकांनी उमेदवारासाठी सुरू केलेली मतदान प्रक्रिया थांबवली. आता हा वाद प्रदेश पातळीवर पोचला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार निश्चितीसाठी पक्षातंर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये मतदान प्रक्रिया राबवत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची संकल्पना आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी ही प्रक्रिया यशस्वी पार पडली. इथं आठ जण इच्छुक होते. यासाठी 268 पदाधिकाऱ्यांना मतदानासाठी आमंत्रित केले होते. त्यातील 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी बंद पाकिटात उमेदवाराचं नाव सुचवलं. अशीच प्रक्रिया शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राबविताना मात्र वाद उफळला.

 MLA Monika Rajale
Ajit Pawar and bjp in Ahmednagar : अजितदादाच्या भिडूचं टेन्शन वाढलं?, नगरच्या उमेदवारीसाठी भाजपनं लढवली 'शक्कल'!

आमदारांविरोधात रोष

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या (BJP) आमदार मोनिका राजळे आहेत. आमदार राजळे समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जुना संघर्ष आहे. हा संघर्ष मध्यंतरी टोकापर्यंत पोचला होता. उमेदवार निवडीसाठी मतदान प्रक्रिया नगरच्या विश्रामगृहावर राबवत असताना, हा संघर्ष काल पुन्हा उफाळला. आमदार मोनिका राजळे यांनी मतदानाची माहिती पदाधिकाऱ्यांना दिलीच नाही, असा आरोप शेवगाव भाजपचे तुषार वैद्य, अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी केला.

 MLA Monika Rajale
Amit Bhangare : पिचड पिता-पुत्रांची भेट खटकली; अमित भांगरे 'अलर्ट मोड'वर, पोचले शरद पवारांच्या भेटीला...

विरोधला विरोध

आमदार राजळे यांनी चुकीचे पदाधिकारी मतदानाला उभे केले आहे, असा आरोप करत मतदान प्रक्रियेला विरोध केला. आमदार राजळे समर्थक देखील यावेळी आक्रमक झाले. आरोप चुकीचे आणि खोटे आहेत. मतदान प्रक्रियेची माहिती प्रदेश पातळीवरून देण्यात आली होती. यात आमदारांचा कोणताही संबंध नाही. बोटावर मोजण्याएवढे पदाधिकारी जाणीवपूर्वक विरोधाला विरोध करत आहेत, खोट पसरवित आहेत, यातून राजळे यांना जाणीवपूर्वक विरोध करून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप आमदार राजळे समर्थकांनी केला.

जिल्हाध्यक्षकांकडून सावरासावर

पक्ष निरीक्षकांसमोर या दोन गटांमध्ये टोकाचा वाद झाला. पक्ष निरीक्षकांनी वाढलेला वाद पाहून मतदान प्रक्रिया थांबवली. शेवगाव-पाथर्डीमधील आमदार राजळे समर्थक आणि भाजप पदाधिकारी यांच्यातील वाद पुन्हा प्रदेश पातळीवर गेला आहे. दरम्यान, भाजपचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कोणताही गोंधळ झालेला नाही. वेळेअभावी काही पदाधिकाऱ्यांना मतदानासाठी नावं देता आली नाही. बैठक शांततेत झाली, असे सांगत सावरासावर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com