NCP leader Supriya Sule
NCP leader Supriya Sule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचा प्रश्न, भोंगे आंदोलन कोणाच्या अंगलट आले?

Sampat Devgire

धुळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण (MNS Politics) सध्या कोणाच्या अंगलट आले, हा चर्चेचा विषय आहे. यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, या विषयामुळे शिर्डी, पंढरपूरचे भोंगे उतरले, रात्री दहानंतर चालणारे कीर्तन बंद झाले. जिथे ८०-२० टक्के हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) असे समीकरण आहे तेथे भोंगे कुणाचे जास्त असा सवालच त्यांनी केला. (Supriya Sule asks Loud speaker agitaion create issue to Hindu & Muslims)

खासदार सुळे म्हणाल्या, सध्या देशात महागाई दिसते असे म्हणत श्रीमती सुळे यांनी भोंग्याच्या राजकारणावरही टीका केली. सत्ता असल्यावर लोकांप्रति उत्तरदायित्वही येते हे विसरून चालणार नाही. यावेळी त्यांनी धुळ्यात पाणी उपलब्ध असताना आठ-आठ दिवस पाणी मिळत नसेल तर यातून मार्ग काढला पाहिजे, ते काम आम्हाला करावेच लागेल. असे सांगतिले.

धुळे येथील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात संविधान स्तंभ भूमिपूजन व राष्ट्रीय एकात्मता संवाद कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडलोय अशी खंत व्यक्त करत या देशातील विविधता, वेगळेपणा हीच आपली खरी ताकद आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

त्या पुढे म्हणाल्या, की या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांचे हस्ताक्षर फ्रेम करून मला पहिल्यांदाच मिळाली याचा आनंद आहे. खरंतर डॉ. आंबेडकरांना आपण संविधानपर्यंतच सीमित ठेवून आपण चूक करतोय. त्यांचे कार्य त्यापेक्षा खूप मोठे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञानानुसार बदलावे लागेल

श्री. बरंठ यांनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी शिबिरे घेण्याचे आवाहन केले. त्याअनुषंगाने श्रीमती सुळे म्हणाल्या, की व्हॉटसॲप युनिव्हर्सिटीमुळे विचार क्षमता हरविली आहे. मात्र, नवीन पिढीसाठी आपल्याला तंत्रज्ञानाबरोबर बदलावे लागेल. या तंत्रज्ञानामुळे आमच्यासारख्या राजकीय लोकांना तर मन मोकळे करायला जागाच नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लेखक, कलावंत बोलतील

शंभू पाटील म्हणाले, की आज प्रचंड गोंधळ आहे. मात्र, चांगली लोकदेखील खूप आहे, फक्त आपला सम्यक आवाज काढण्याची गरज आहे. लेखक, कलावंत बोलतील असा विश्‍वासही त्यांनी बोलून दाखविला. श्री. देशमुख यांनी आज विचित्र काळ असला तरी फार बावरुन जाण्याचे, घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. श्री. काणेकर यांनीही विचार मांडले. श्री. शिरसाट यांनी मनोगतातून संस्थेचा इतिहास मांडला. प्रा. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. टी. गवळे यांनी बुद्धवंदना सादर केली. श्री. पिंगळकर यांनी आभार मानले. नाजनीन शेख यांनी ‘वैष्णव जन तो...’हे गीत सादर करून मान्यवरांसह उपस्थितांची दाद मिळविली.

यावेळी माजीमंत्री तथा धुळे जिल्हा हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष हेमंत देशमुख अध्यक्षस्थानी होते. हरिजन सेवक संघाचे महाराष्ट्र सचिव मधुकर शिरसाट, विजय काणेकर, सुगन बरंठ, प्रा. विलास चव्हाण, प्रा. जितेंद्र पिंगळकर, ग. पा. माने, शंभू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन टिळे, नगरसेवक नागसेन बोरसे, मालती शिरसाट, काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयाच्या अधीक्षिका अनिता रामराजे-शिरसाट आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT