Supriya Sule news : महाराष्ट्रात शेतकरी नैसर्गिक आपत्तीने कोसळला आहे. पिकांची नासाडी झाली आहे. शासनाच्या धोरणामुळे पिकांचे भाव कोसळले आहेत. दिवसागणिक महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने कर्जमाफी करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.
गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाशिक मध्ये आक्रोश मोर्चा काढला होता. गुरुवारी जळगाव मध्ये शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते.
राज्यात आणि देशात पिकांचे दर कोसळले आहेत. कांदा द्राक्ष केळी यांसह सर्वच दर कोसळल्याने शेतकरी खचला आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेती आणि पिके नष्ट झाली आहेत. यावर सरकार केवळ पंचनामे करण्याचे आदेश देत आहे. त्याने प्रश्न सुटणार नाही, असे सुळे म्हणाल्या.
खासदार सुळे यांनी नाशिकच्या मेळाव्यात भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले होते. यही समय है, सही समय है, असे भाजप नेहमी सांगते. कर्जमाफीसाठी देखील "यही समय है, सही समय है"असे प्रतिउत्तर खासदार सुळे यांनी भाजपला दिले.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी होत आहे. अन्न धान्यांपासून तर भाजीपाला आणि अन्य पिकांची नासाडी झाली आहे. जमिनीमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात मोठ्या अडचणी येऊ शकता. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी कर्जमाफीचा विषय पुन्हा पुढे केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.