Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याने समर्थक आक्रमक; जाब विचारायला जाताच दोन गटात बाचाबाची, भेंडेगावात तणाव

Manoj Jarange Video Controversy : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे वसमत तालुक्यातील भेंडेगावात दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News, 19 Sep : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे वसमत तालुक्यातील भेंडेगावात दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन गट आमने-सामने आल्यामुळे भेंडेगावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (ता.18) ओबीसींचा कळमनुरी येथे मोर्चा होता.

यावेळी एका व्यक्तीने मनोज जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच महागाव आंबासह इतर गावातील तरुण या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी भेंडेगावात जाब विचारण्यासाठी गेले होते.

Manoj Jarange Patil
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट! आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत 'हे' काम करावंच लागणार

यावेळी दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. यामुळे काही काळ गावामध्ये तणावाचं वातावण निर्माण झालं होतं. मात्र, कुरुंदा पोलिसांनी जमावाला पांगवलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली.

तर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देताच पोलीस ठाणे परिसरातील गर्दी कमी झाली. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी एक तक्रार आली आहे. त्या प्रकरणी कारवाई केली जात असल्याची माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी दिली.

Manoj Jarange Patil
Shivsena Politics : 'आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते...', PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीमधील फोटोवरून नवा वाद, दोन्ही शिवसेना आक्रमक

दरम्यान, आता भेंडेगावात आणि पोलीस ठाणे परिसरामध्ये आता शांतता आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, कायदेशीर प्रक्रिया पोलीस करत असल्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे. तसंच ओबीसी मोर्चामध्ये संबंधित व्यक्तीने जरांगे यांच्या संबंधित बनवलेला तो व्हिडिओ खरा आहे का? याबाबत योग्य ती चौकशी करून आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com