Supriya Sule hints on BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Supriya Sule hints on BJP contact : सूचक कानटोचणी? आयुष्यात संघर्ष आला तो 'बॉम्बस्फोटा'सारखा! सुप्रिया सुळे बरचं सांगून गेल्या...

Supriya Sule Hints About Amit Bhangare BJP Links in Sangamner : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संगमनेर दौऱ्यात युवा नेत्यांच्या सत्तेच्या उत्सुकतेविषयी सूचक विधान केलं.

Pradeep Pendhare

Sangamner Ahilyanagar politics : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये बऱ्याच राजकीय गणितांची उलथापालथ होण्याचे संकेत आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आणि राहुरी इथून प्रबळ दावेदार आहेत.

यानुसार सत्ताधारी भाजपने जुळवाजुळवी करण्यास सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधकांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. याची दखल घेत संगमनेर दौऱ्यात सुप्रिया सुळेंनी सूचक, असं विधान करत, युवा नेत्यांची काहीशी कानटोचणी केली आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांनी गणितं जुळवाला सुरूवात केली आहे. भाजपचे (BJP) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनीता भांगरे आणि अमित भांगरे यांची भेट झाली. लवकरच निर्णय होईल, असे संकेत मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत. या सर्व घडामोडीनंतर सुप्रिया सुळे यांचा काल संगमनेर दौरा झाला.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले इथं दौऱ्यावर येत कार्यक्रमात जोरदार भाषण केलं. यात सूचक विधान करताना युवा नेत्यांच्या सत्तेच्या अपेक्षांविषय सूचक विधानं केली. सत्ताधारी अन् विरोधकांचा संघर्षावर भाष्य करताना, संघर्ष करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "नीलेश लंके निवडून येतील की नाही, अशी परिस्थिती होती. पण तुम्ही आम्हाला भरपूर मदत केली अन् लंके निवडून आले. त्यावेळी तर आमची अशी परिस्थिती होत की, आमच्याकडे चिन्ह पण नव्हतं. अमोल कोल्हे म्हणायचे, कपबशी चिन्हं घ्यायचं. पण याच काळात, इलेक्शन कमिशन यांचा आमच्यावर विशेष प्रेम होतं. पांडुरंगाची कृपा झाली आणि आम्हाला तुतारी वाजवणारी माणूस चिन्हं मिळालं. या चिन्हांमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिली. संसदेत शर पवार यांची खासदार पाठवली."

सर्व काही विरोधात

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना चिन्हाचा पत्ता नव्हता, असे सांगातना, व्यासपीठावर नवीन इच्छुकांना सुप्रिया सुळेंनी एक गोष्ट सांगितली. "सगळे आमच्या विरोधात होते. सत्ता विरोधात, जिल्हा परिषद देखील विरोधात, पंचायत समिती आमच्या विरोधात, पालकमंत्री विरोधात, दूध संघ विरोधात, साखर कारखाना आमच्या विरोधात, सरपंच आमच्या विरोधात, कोण बाजूला हे तर सोडूनच द्या, आमच्या नंतर लक्षात आले की, सगळे नेते आमचे विरोधात, सगळी यंत्रणा विरोधात. पण एकच व्यक्ती आमच्या बाजूने होती. ते म्हणजे निष्ठावान मतदार!", असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नेते कुठेही गेले तरी...

'मतदार तुमच्या बाजूने असल्यावर नेते कुठे असले तरी काहीच फरक पडत नाही. जोपर्यंत मतदार राजांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे, तोपर्यंत मागं हटायचं नाही. खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पण त्यातून गेलेले आहे, आम्ही सर्व त्याच्यातून गेलेलो आहोत. संघर्ष होता, स्वतःची लढाई होती अन् लढने में बहुत मजा है,' असे सुप्रिया सुळे यांनी म्हणत सत्ताधाऱ्यांना सूचक सुनावले.

संघर्ष 'बॉम्बस्फोटा'सारख आला

सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांच्या आभार मानताना म्हणाल्या, 'मला लढाई ही कधीच माहिती नव्हती, लढाई ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यातून शिकले. आयुष्यात कधी एवढा संघर्ष आलाच नाही, जो आला तो 'बॉम्बस्फोटा'सारख आला. छोटा-मोठा आलाच नाही. त्यानंतर समजलं की इतिहास, लढणाऱ्यांचा लिहिला जातो. संघर्ष करणाऱ्यांचाच लिहिला जातो,' असे म्हटल्या.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT